शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाची फसवणुक करणारा तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षक गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By अजित मांडके | Updated: November 19, 2022 16:36 IST

स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेऊन रिक्षा चालकाची फसवणुक केल्याचे प्रकरण कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले आहे.

ठाणे : सहाय्यक पोलीस निरिक्षक असल्याचे सांगून आपल्या साथीदाराचे मदतीने एका रिक्षा चालकाला गणपती रोडवर अडवून त्याच्याजवळील मोबाइल हिसकावला. त्यातील तो संदेश डिलीट कर असे सांगत मोबाइल हाताळून मोबाइलमध्ये असलेल्या एक्सोडुस नावाचे बिट कॉईन अॅपमधून ७ हजार ६६९ युएस डॉलर अर्थात भारतीय चलनात ५ लाख ७२ हजार ९६४ रुपये त्यांच्या स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेऊन रिक्षा चालकाची फसवणुक केल्याचे प्रकरण कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले आहे.

या प्रकरणी फसवणुक करणा:या तोतया पोलीसाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामदास जगताप (४१) रा. न्यु अभिषेक सोसायटी, मनिषा नगर कळवा असे आहे. अटक आरोपी याने रिक्षा चालकाची फसवणुक केल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानुसार हिरव्या रंगाची कार विषयी त्यांना माहिती मिळाली. या कारच्या नंबरची माहिती आरटीओकडून प्राप्त केली.

तसेच मोबाइल नंबरच्या तांत्रिक तपास व इतर माहितीच्या आधारे आरोपी याचा राहण्याचा पत्ता शोधण्यात आला. तो कशेळी भिवंडी याठिकाणी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार मोठय़ा शितीफीने त्याला अटक करण्यात आले. त्याच्याकडे अधिक माहिती घेतली असता, तो कळवा येथे राहणार असल्याची माहिती तपसात पुढे आली. अटक आरोपीकडून गुन्ह्यात फसवणुक करण्यात आलेल्या रकमेपैकी १ लाख ४० हजार, बनावट गणवेश, १ लाख ६० हजार रुपये किमंतीची कार असा 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणे