शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

अनेक वर्षांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया अखेर बायकोमुळे आला अडचणीत, झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 16:59 IST

अवघ्या २२ वर्षांचा आरोपी झाला जेरबंद

Drugs Smuggler Arrested: चोर आणि पोलिस यांच्यातील लपंडावाच्या बातम्या आपण रोजच वाचतो. पोलिस चोरांचा पाठलाग करतात आणि चोरांना पकडून तुरूंगात टाकतात. इतकेच नव्हे तर सापळा रचूनही अनेक चोरांना अडकवले जाते. पण अनेक वर्षांपासून पोलिसांना चकवणारा आणि फरार असणारा आरोपी आपल्या पत्नीमुळे पकडला गेला असं जर तुम्हाला समजलं तर नक्कीच याबाबत अधिक वाचायची उत्सुकता वाटेल ना... गेल्या अनेक वर्षांपासून एक ड्रग माफिया फरार होता. कितीही प्रयत्न केला तरी तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पण नुकताच इंटरपोलने त्या ड्रग माफियाला पकडले आणि अटक केली. महत्त्वाची बाब म्हणजे तो पकडला गेला त्यामागे त्याची बायको कारणीभूत ठरली. 

गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या ड्रग माफियाला इंटरपोलने पकडले. पत्नीच्या गरोदरपणात तिला भेटायला आलेला असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अटक केली. इंटरपोलला टीप मिळाली होती की, त्याची पत्नी एका मुलाला जन्म देणार आहे आणि त्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला येणार आहे. त्यामुळे माहिती मिळताच इंटरपोलच्या टीमने सापळा रचला आणि फरार असलेला उरुग्वेचा ड्रग माफिया डिएगो निकोलस मार्सेट अल्बा याला अखेर ब्राझीलमधून अटक करण्यात आली.

ड्रग माफिया डिएगो मार्सेट ब्राझील, बोलिव्हिया, पॅराग्वे आणि उरुग्वेमध्ये आपली ओळख बदलून वर्षानुवर्षे जगत होता. डिएगो दक्षिण अमेरिकेत मोठा व्यवसाय करतात. डिएगो हा सुरूवातीला ड्रग स्मगलर होता आणि त्याने ड्रग्ज तस्करांच्या मोठ्या नेटवर्कशी जवळून काम केले होते. हे नेटवर्क दक्षिण अमेरिकेतून युरोपात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करत असे. २२ वर्षीय डिएगो केवळ ड्रग्सच्या तस्करीतच गुंतला नव्हता, तर तो अनेक हाय-प्रोफाइल खूनांमध्येही सामील होता अशी माहिती मिळाली.

मार्सेटची पत्नी तपासणीसाठी ब्राझीलमधील रुग्णालयात जात असल्याची इंटरपोलने सामायिक केलेल्या गुप्तचर माहितीमुळे डिएगोच्या अटकेची सोय झाली. प्रसूतीची तारीख जवळ आल्याने तिला नियमित रुग्णालयात जावे लागत होते. इंटरपोलला ही माहिती मिळाली. ब्राझील पोलिसांना संशय आल्यावर त्याच्या पत्नीवर स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. डिएगो स्वत: पत्नीसोबत घरी राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर इंटरपोलच्या पथकाने अटक केले.

टॅग्स :Arrestअटकpregnant womanगर्भवती महिलाCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ