शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरीत पाळीव मांजरीला ठार मारले; अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Updated: October 4, 2023 19:51 IST

मांजराची मालकीण अनुराधा चौधरी (५५) यांनी ओशिवरा पोलिसात केली तक्रार

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अंधेरी परिसरात पाळीव मांजरीला ठार मारल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मांजराची मालकीण अनुराधा चौधरी (५५) यांनी ओशिवरा पोलिसात तक्रार दिली आहे.

चौधरी या अंधेरी पश्चिमच्या इंद्रदर्शन फेज या ठिकाणी राहत असून फार्मा व्यावसायिक आहेत. त्यांच्या घरात त्यांनी एकूण ६ मांजरी पाळल्या असून त्यांची देखभाल त्याच करतात. चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सहा पाळीव मांजरीपैकी लिमा नावाचे स्त्री तर ओशन नावाचे पुरुष जातीचे मांजर २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान हरवले होते. त्यापैकी ओशन हे मांजर १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चौधरी यांना बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांनी त्या मांजराला तातडीने प्राण्यांच्या दवाखान्यात नेले. त्यानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास ते मांजर मयत झाले. चौधरी यांनी ओशनचा अंत्यविधी उरकला आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्याच्या विरोधात तक्रार दिली. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी संबंधित कलमा अंतर्गत अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी