शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

माय कारच्या ‘सीईओ’ विरोधात विनयभंग प्रकरणी गुन्हा, भूमकर चौकाजवळील घटना

By नारायण बडगुजर | Updated: September 23, 2023 21:42 IST

माय कार शोरुममध्ये काही दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार समोर आला होता

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: लगट करून महिलेसोबत गैरवर्तन कले. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी माय कार शोरूमच्या ‘सीईओ’ विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार २५ एप्रिल २०२३ ते २४ ऑगस्ट २०२३ दरम्यान वाकड येथील भूमकर चौकाजवळ घडली. 

या प्रकरणी २७ वर्षीय पीडित महिलेने गुरुवारी (दि. २१) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सीईओ सोमन गौडा अमृता गौडा पाटील (४८, रा. आदर्शनगर, मुकाई चौक, किवळे) याच्यासह अन्य दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला भूमकर चौक, वाकड येथील माय कार शोरूममध्ये काम करीत होत्या. दरम्यान, सीइओ पाटील याने पीडित महिलेशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, अश्लील इशारे करीत महिलेला केबिनमध्ये बोलवले. पीडित महिलेने याकडे दुर्लक्ष केले असता इतर महिलांनी पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ‘‘पाटील सरांसोबत बोलत जा, ते तुझा व मुलाचा सांभाळ करतील, तुला काही अडचण येणार नाही’’, असे इतर दोन महिला बोलल्या. त्यास पीडितेने स्पष्ट नकार दिला. त्यावेळी त्यांनी आपसात संगनमत करून पीडितेची बदनामी करीत तिला कामावरून काढून टाकले. दरम्यान, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पीडित महिला पार्किंगमधून दुचाकी काढत असताना सीईओ पाटील याने त्यांच्याशी गैरवर्तन केले, असे फिर्यादीत नमूद आहे.  भूमकर चौक, वाकड येथील माय कार शोरुममध्ये काही दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार समोर आला होता. त्यावेळी देखील एका पीडित तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, सीईओ पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुरुवारी (दि. २१) सलग दुसरा गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी