शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरावर छापा मारताच सापडला अंमली पदार्थाचा साठा

By अरुण आडिवरेकर | Updated: May 14, 2023 01:11 IST

मुबिन रशिद हकीम, मस्तान मकदुम शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे

अरुण आडिवरेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : शहर पाेलिसांच्या विशेष पथकाने रत्नागिरी शहरातील एका घरात छापा टाकून २.९४ ग्रॅम ब्राऊन हेराॅईन आणि १६.५८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१२ मे) रात्री ११:५५ वाजता धनजीनाका-आंबेडकर राेड येथे करण्यात आली. या कारवाईत दाेघांना अटक केली असून, त्यांना १५ मेपर्यंत पाेलिस काेठडी ठाेठावण्यात आली आहे.

मुबिन रशिद हकीम (२२, रा. धनजीनाका, आंबेडकरवाडी रत्नागिरी), मस्तान मकदुम शेख (२४, रा. मच्छिमार्केट, बाजारपेठ, रत्नागिरी) अशी दाेघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पाेलिस अंमलदार शांताराम झाेरे यांना धनजीनाका-आंबेडकरवाडी राेड येथील रशिद हकीम याचा मुलगा मुबीन हकीम त्याच्या घरी अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी शुक्रवारी रात्री घरावर छापा टाकला. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खाेलीत दाेघेजण संशयितरित्या बसलेले हाेते. तसेच खाेलीत फाॅईल पेपरचे तुकडे, सिगारेटचे अर्धवट जळालेले तुकडे दिसले.

त्यानंतर मुबिन हकीम याची अंगझडती घेतली असता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कागदाच्या एकूण ११५ लहान पुड्यांमध्ये टर्की पावडर व स्माेकिंग ब्राऊन पेपर मिळाले. तसेच मस्तान मकदुम शेख यांची अंगझडती घेतली असता पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गांजा सापडला. या अमली पदार्थांची तपासणी केली असता ब्राऊन हेराॅईन व गांजा असल्याचे निष्पन्न झाले. दाेघांवर एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई परिविक्षाधीन पाेलिस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील, नियंत्रण कक्षाचे सहायक पाेलिस निरीक्षक संजय पाटील, अमर पाटील, शीतल पाटील, सहायक पाेलिस फाैजदार विलास दिडपसे, पाेलिस हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, अरुण चाळके, बाळू पालकर, सागर साळवी, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर, योगेश नार्वेकर, विवेक रसाळ, विद्या लांबोरे, छाया चौधरी, सांची सावंत, अक्षय कांबळे यांनी केली. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी