शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

आयकर विभागाचा छापा, आठ कोटींचा कर चुकवल्याप्रकरणी डोंबिवलीत व्यापाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 08:15 IST

डीआरआयची कारवाई, आयातीची किंमत कमी दाखवली

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चीनवरून आयात होणाऱ्या स्टेशनरी उत्पादनांची किंमत कमी दाखवत तब्बल आठ कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा ठपका ठेवत केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी डोंबिवली येथील एका व्यापाऱ्याला अटक केली आहे. राजेश वैष्णव असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून या प्रकरणी त्याच्या भिवंडी येथील गोडाऊनवरदेखील डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती.

उपलब्ध माहितीनुसार, संबंधित व्यापाऱ्याचा स्टेशनरी मालाचा व्यवसाय असून तो प्रामुख्याने चीन येथून गेल्या पाच वर्षांपासून मालाची आयात करत आहे. सामानाच्या खरेदीचे जे चलन बनविण्यात येत होते ते चलन वैष्णव स्वत:च बनवत असे. ते चलन चिनी कंपनीला पाठवून त्यांच्याकडून त्यावर त्याला स्टॅम्प करून ते पाठविण्यात येत होते. मूळ खरेदीच्या ४० ते ५० टक्के इतकीच रक्कम या चलनवर नमूद केलेली असे. यामुळे त्याला आयात केलेल्या मालावर कमी शुल्क भरावे लागले.

पाच वर्षांत बुडविला करगेल्या पाच वर्षांत मिळून त्याने अशा पद्धतीने केलेल्या व्यवहारांमुळे सरकारचा आठ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा ठपका डीआरआयने त्याच्यावर ठेवला आहे. तर, या मालाचे उर्वरित पैसे तो हवालाच्या मार्गाने संबंधित चिनी कंपनीला पाठवत असल्याचे डीआयआरच्या अधिकाऱ्यांच्या प्राथमिक पडताळणीमध्ये दिसून आले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणbusinessव्यवसायIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय