शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खुलासा! फक्त श्वानांसाठी राखीव ठेवला एक बंगला; निकटवर्तीयाकडे सापडलं मोठं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 13:04 IST

६९ वर्षीय टीएमसीचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्याकडे आणखी काही मालमत्ता आहे. त्याचसोबत पार्थ आणि अर्पिता यांनी संयुक्तरित्या शांती निकेतन येथे एक अपार्टमेंट घेतली होती

कोलकाता - पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीकडून तपास सुरू आहे. त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. ईडीच्या चौकशीत मंत्री पार्थ चॅटर्जी यांचं डायमंड सिटीमध्ये आणखी ३ बंगले असल्याचं समोर आले. हे बंगले पूर्णत: वातानुकुलनित आहेत. इतकेच नाही तर यातील एक लग्झरी फ्लॅट असाही आहे ज्यात पार्थ चॅटर्जी यांच्या पाळीव श्वानांना ठेवले जाते. पार्थ हे प्राणीमित्र आहेत. त्यामुळे एक बंगला केवळ त्यांच्या कुत्र्यांसाठी राखीव ठेवला आहे. 

ED आता पश्चिम बंगालमधील मंत्री पार्थ चॅटर्जी(partha chatterjee) यांची सखोल चौकशी करत आहे. तपासात समोर आलंय की, पार्थ यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. सूत्रांनुसार, पार्थ चॅटर्जी यांच्याकडे फ्लॅट नंबर १८ डी, १९ डी आणि २० डी हे मालकीचे बंगले आहेत. हे ३ फ्लॅट डायमंड सिटीत आहेत. याठिकाणी एका बंगल्यात अभिनेत्री अर्पिता मुखर्जी राहत होती. जिच्या घरातून २१ कोटी २० लाख रुपये रोकड आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. 

६९ वर्षीय टीएमसीचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्याकडे आणखी काही मालमत्ता आहे. त्याचसोबत पार्थ आणि अर्पिता यांनी संयुक्तरित्या शांती निकेतन येथे एक अपार्टमेंट घेतली होती. शांती निकेतनमधील ७ घर आणि अपार्टमेंटचीही ईडी चौकशी करणार आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने पार्थ यांची २६ तास चौकशी करून त्यांना अटक केली. अटकेनंतर पार्थ यांची तब्येत ढासलली तेव्हा कोलकाता येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिथून आता SSKM रुग्णालयात त्यांना रेफर केले आहे. 

अर्पिताच्या घरी सापडला नोटांचा ढिगईडीने पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांनाही अटक केली होती. अर्पिता यांच्या घरातून तब्बल २१ कोटी २० लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. अर्पिता यांच्या घरातील रोकड पाहून सगळेच अवाक् झाले. नोटा मोजण्याच्या २ मशिनने दोन दिवस अर्पिता यांच्या घरी नोटांची मोजणी सुरू होती. त्याचसोबत अर्पिताच्या घरातून ७९ लाखाचे सोने आणि ५४ लाख रुपये परदेशी नोटा आढळून आल्या आहेत. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय