शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

डाेक्यात काठी घालून वृद्ध आईचा केला खून; निर्दयी मुलाला पोलिसांनी केली अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: February 21, 2024 08:10 IST

घटनास्थळी डीवायएसपी भागवत फुंदे, पाेलिस निरीक्षक एस.डी. नरवाडे यांनी भेट दिली. तपास सपाेनि. देवकत्ते करीत आहेत.

लातूर : वृद्ध आईचा डाेक्यात काठी घालून मुलाने खून केल्याची घटना लातुरातील वाल्मिक नगरात मंगळवारी घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी आराेपी मुलाला अटक केली आहे.

लातुरातील वाल्मिक नगरात राहणाऱ्या सुभाषचंद्र कंदले (वय ८५) हे पत्नी आणि मुलासाेबत वास्तव्याला आहेत. मंगळवारी आई प्रभावती (वय ७९) जेवण घेवून मुलगा पुनमचंद्र कंदले (वय ४०) याच्या खाेलीत गेली. दरम्यान, मुलाने वृद्ध आईच्या डाेक्यात काठी घातल्याने ती गंभीर जखमी अवस्थेत जाग्यावरच काेसळली. बाहेर वडिल अंथरुणावर पडून हाेते. बराच वेळ झाले, पत्नी खाेलीतून बाहेर का आली नाही? असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला याची माहिती दिली. मुलगाही घरी दाखल झाला. मात्र, आराेपी मुलाने खाेलीला आतून कडी लावली हाेती. याबाबतची माहिती एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिसांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पाेलिसांनी खाेलीचे दार उघडले. मृतावस्थेत पडलेल्या प्रभावती कंदले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूर शासकीय रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळी डीवायएसपी भागवत फुंदे, पाेलिस निरीक्षक एस.डी. नरवाडे यांनी भेट दिली. तपास सपाेनि. देवकत्ते करीत आहेत.

याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात जयकुमार कंदले (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी पुनमचंद्र कंदले याला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी