शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मच्छरदाणीसाठी न्यायालयात आणली मेलेल्या डासांची बाटलीच; गँगस्टर लकडावाला याची शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 07:32 IST

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा माजी सहकारी एजाज लकडावाला याचा मच्छरदाणी देण्यासंदर्भातील अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला.

मुंबई : तळोजा कारागृहात डासांचा प्रार्दुभाव वाढला असून त्यापासून संरक्षण म्हणून मच्छरदाणी मिळावी, यासाठी गँगस्टर इजाज लकडावाला याने अनोखी शक्कल लढवली. त्याने मेलेल्या डासांनी भरलेली प्लास्टिकची बाटलीच न्यायालयात ठेवली. त्याच्या या कृत्याची चर्चा तर झालीच. मात्र, मच्छरदाणी मिळविण्यासाठी त्याने लढवलेली शक्कल कामी आली नाही. न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. 

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा माजी सहकारी एजाज लकडावाला याचा मच्छरदाणी देण्यासंदर्भातील अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. लकडावाला याच्यावर अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात मकोकाचाही समावेश आहे. लकडावाला याला जानेवारी २०२० मध्ये अटक करण्यात आली. तो सध्या तळोजा कारागृहात आहे. मच्छरदाणी वापरण्याची परवानगी मिळावी, यासाठी त्याने काहीच दिवसांपूर्वी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

जानेवारी २०२० मध्ये  जेव्हा मला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तेव्हा मच्छरदाणी वापरण्याची परवानगी दिली होती आणि यंदा मे महिन्यापासून सुरक्षेच्या कारणास्तव मच्छरदाणी वापरण्यास मनाई केली, असे लकडावालाने अर्जात म्हटले आहे. गुरुवारी जेव्हा लकडावाला याला न्यायालयात हजर केले तेव्हा त्याने मेलेल्या डासांनी भरलेली प्लास्टिकची बाटलीच न्यायालयात सादर केली. कारागृहातील कैद्यांना नेहमीच या समस्येला सामोरे जावे लागते. मात्र, कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव लकडावालाच्या अर्जाला विरोध केला. लकडावालाचा अर्ज फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, अर्जदार क्रीम लावू शकतो. लकडावालाशिवाय अन्य कच्च्या आरोपींनीही मच्छरदाणीसाठी न्यायालयात अर्ज केला होता.  

 उपाययोजना करण्याचे दिले होते आदेश  

दरम्यान, काही न्यायाधीशांनी मच्छरदाणीसाठी परवानगी दिली तर काही न्यायाधीशांनी दिली नाही. गँगस्टर डी.के. राव याला कारागृहात मच्छरदाणी वापरण्याची परवानगी दिली तर एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींना परवानगी नाकारली.सप्टेंबर महिन्यात गौतम नवलखा यांनी मच्छरदाणी वापरण्याची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र, त्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. या अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आखण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :jailतुरुंगHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबई