शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घरच्यांना न सांगता लिव्ह इनमध्ये राहत होता बँक ऑफिसर; मृत्यूनंतर घरवाले पोहोचताच पोलीस चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 14:22 IST

चक्रावलेल्या पोलिसांनी दोघांनाही शांत करत एक प्रस्ताव ठेवला. त्या महिलेच्या दाव्यानुसार ९ वर्षांची मुलगी हितेशपासून झालेली होती.

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये पती-पत्नीच्या नात्याचे एव विचित्र प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या एका महिलेने बँकेच्या मृत फिल्ड ऑफिसर आपला पती असल्याचा दावा केला आहे. त्याच्यापासून तिला नऊ वर्षांची मुलगीही आहे. तर घरच्यांनी तो अविवाहित असल्याचे म्हटल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

बँक ऑफ बडोदाच्या जैतीपूर शाखेत फिल्ड ऑफिसर हितेश कुमार (३४) याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता. यानंतर त्याचा मृतदेह घेण्यासाठी हितेशचे कुटुंबीय आले होते. तेवढ्यात एका मुलीला घेऊन तिथे महिला देखील पोहोचली होती. दोघांनीही त्याचे कुटुंब असल्याचा दावा केला होता. परंतू दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. तिला सून म्हणून स्वीकारण्यास हितेशचे घरवाले तयार नव्हते. यामुळे तिथे जोरदार खडाजंगी उडाली होती. 

यामुळे चक्रावलेल्या पोलिसांनी दोघांनाही शांत करत एक प्रस्ताव ठेवला. त्या महिलेच्या दाव्यानुसार ९ वर्षांची मुलगी हितेशपासून झालेली होती. असे असेल तर तिचा डीएनए हितेशच्या डीएनएसोबत जुळतो का ते पाहू. यावर हितेशच्या घरवाले देखील राजी झाले. जर डीएनए जुळला तरच आम्ही त्यांना स्वीकारू असे ते म्हणाले आहेत. पोलिसांनी हुशारी दाखवून मृतदेहाचे देखील डीएनए सॅम्पल घेऊन ठेवले आहे. उद्या यांचे प्रकरण कोर्टात गेले तर तपास करता यावा यासाठी पोलिसांनी ही सोय करून ठेवली आहे. घरवाल्यांनी सांगितले की, हितेशचे अद्याप लग्न झालेले नाहीय. तर महिलेने सांगितले की, हितेशने लग्न केल्यानंतर तिला दिल्लीत ठेवले होते. त्यांना नऊ वर्षांची मुलगीही आहे. या महिलेचे नाव मायदेवी आहे. 

माया देवी यांनी सांगितले की, त्यांनी हरिद्वारमध्ये फील्ड ऑफिसर हितेशला पहिल्यांदा भेटली होती. प्रेमप्रकरणामुळे डेहराडूनमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर हितेश तिच्या संपर्कात होता. यानंतर दोघांनी लग्न केले. मायाने सांगितले की, हितेश शनिवारी आणि रविवारी तिच्याकडे येऊन राहायचा. तो त्यांच्यासोबत सुट्ट्याही घालवत असे, पण त्यांना त्यांच्या घरातील सदस्यांसमोर कधीही येऊ दिले नव्हते. माया आणि हितेश हे लिव्ह इनमध्ये राहत होते, परंतू लग्न केल्याचा पुरावा तिच्याकडे नाहीय. यामुळे मुलीचा डीएनए जुळणेच त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी