शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"मला छळलंय, त्यासाठी जीव देतोय" पतीनं नदीत उडी मारली; बायकोला अखेरचा म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 16:23 IST

राहुलने काही लोकांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्याकडून दबाव येत असल्याचं म्हटलं.

लखनौ - शहरातील समतामूलक चौकात शनिवारी रात्री गांधी सेतू पुलावरून नदीत उडी मारण्याआधी राहुल आर्याने फेसबुक लाईव्ह केले होते. त्यात राहुलने अनेक लोकांवर छळल्याचा आरोप करत आत्महत्येसाठी त्यांना जबाबदार धरले. राहुल आर्याच्या घरातून एक सुसाईड नोटही पोलिसांनी सापडली. त्याआधारे आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

सुसाईड नोट, लाईव्ह व्हिडिओ आणि पत्नीच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी पाच पानी गुन्हा नोंद केला आहे. रविवारी अनेक तास एसडीआरएफ टीम राहुलचा शोध घेत होती. परंतु रात्री उशीरापर्यंत राहुलचा काहीच थांगपत्ता लागला नाही. याबाबत पोलीस निरिक्षक दिनेश चंद्रा म्हणाले की, राहुल आर्या हजरतगंजच्या प्लास कॉलनीत राहतो. तो खासगी संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करतो. शनिवारी रात्री राहुलने गोमती इथं उडी घेतली. मात्र त्याआधी त्याने फेसबुकवर लाईव्ह केले होते. 

यात राहुलने काही लोकांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्याकडून दबाव येत असल्याचं म्हटलं. छळाला कंटाळून राहुलने आत्महत्या केली. हा व्हिडिओ पाहून कुटुंबही अवाक् झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, ८ वर्षापूर्वी राहुलचा ज्यांच्याशी वाद झाला होता त्याचे नाव त्याने आत्महत्या करण्यापूर्वी घेतले होते. सुसाईड नोटमध्येही ती नावे आहेत. राहुलची पत्नी संजना तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी टोनी सिक्का, सुजीत वर्मा, रितिका, राधा आणि नेहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. 

पत्नीला सांगितलं, थोड्याच वेळात येतो...संजनाने सांगितले की, शनिवारी रात्री ९ च्या सुमारास राहुलसोबत घरी परतले होते. घरी आल्यानंतर राहुल थोड्याच वेळात येतो सांगून घराबाहेर पडला. मी साडे अकराच्या सुमारास मोबाईल पाहिला तेव्हा राहुलचा फेसबुकवरचा लाईव्ह व्हिडिओ पाहून धक्का बसला. मी तातडीने घरच्यांना या व्हिडिओची माहिती दिली. त्यानंतर राहुलला कॉल लावला तो एका पोलिसाने उचलला. त्यांनी गांधी सेतू पुलावर यायला म्हटलं. त्याठिकाणी पोहचल्यावर राहुलने नदीत उडी मारल्याचं कळालं. शिवनगरच्या मुलांसोबत राहुलचा वाद झाला होता. त्यात सुजीत वर्मा उर्फ कुक्कूच्या कुटुंबाने मदत केली होती. या लोकांनी राहुलविरोधातच खोटे गुन्हे दाखल केले. हे प्रकरण काही काळानंतर बंद झाले होते असं पत्नी संजनाने म्हटलं.