शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

लग्नाचं वचन देत ६ महिने संबंध ठेवलं अन्...; २२ वर्षाच्या युवकाचा टोकाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 15:46 IST

शनिवारी सकाळी अचानक राहुल यादवचा मृतदेह त्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

कौशांबी - उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून एका बी फार्माच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या मुलाचा मृतदेह घरच्या खोलीत पंख्याला लटकताना आढळला. मुलाने मरण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. आयुष्य संपवण्यापूर्वी युवकाने एका फेसबुक पोस्टमधून त्याच्या प्रेयसीला मृत्यूसाठी जबाबदार धरले. युवकाच्या मृत्यूची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. 

ही घटना कैमा गावातील आहे. जिथं छोटेलाल यादव जे शेतकरी आहेत. त्यांना २ मुले आणि १ मुलगी आहे. मोठा मुलगा दिल्लीत खासगी नोकरी करतो तर मुलीचे १ वर्षापूर्वी लग्न झाले. सर्वात छोटा मुलगा राहुल यादव सिराथू कॉलेजमध्ये बी फार्मचे शिक्षण घेत होता. फार्माच्या फायनल परीक्षेची तो तयारी करत होता. कुटुंबाच्या माहितीनुसार, राहुल कोविड काळात सार्वजनिक आरोग्य केंद्रात नोकरी करत होता. त्यावेळी तिथे काम करणाऱ्या महिलेसोबत राहुलचे प्रेम जडले. या दोघांमध्ये जवळपास ३ वर्ष संबंध होते. 

शनिवारी सकाळी अचानक राहुल यादवचा मृतदेह त्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी युवकाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आढळली. मुलाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. राहुलने मृत्यूच्या ८ तासपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ज्यात त्याने त्याच्या मृत्यूसाठी प्रेयसीला जबाबदार धरले होते. 

सुसाईड नोटमध्ये प्रेयसीसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं होते की, माझे आयुष्य हिने खराब केले. माझ्याशी लग्न करण्याचे वचन देत ६ महिने संबंध ठेवले आणि आता म्हणते, तू मर, माझे तुझ्याशी देणेघेणं नाही. माझा अनेक महिन्यांपासून मानसिक छळ सुरू आहे. पूर्वी रात्रभर बोलायची आणि इतका छळ करते की ते मला सहन होत नाही. माझे आयुष्य बर्बाद केले. त्यासाठी हीच जबाबदार आहे. नेहमी मुलाची चूक नसते असं त्याने लिहिलं. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.