शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

१६ वर्षीय मुलीला थंडपेयामधून दारु पाजून केला अत्याचार; पीडितेने आपबिती सांगितली अन् पायाखालची जमीन सरकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 10:55 IST

अकोट येथील एका सावत्र पित्याने शहर पोलीस स्टेशनमध्ये १६ वर्षीय मुलगी ही घरी कोणालाही न सांगता निघून गेली.

अकोटः सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. त्यामुळे मुलगी गरोदर राहिल्याचा गंभीर प्रकार शनिवारी समोर आला. विशेष म्हणजे, मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद देणाऱ्या पित्यालाच आता अकोट शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपी सावत्र पित्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अकोट येथील एका सावत्र पित्याने शहर पोलीस स्टेशनमध्ये १६ वर्षीय मुलगी ही घरी कोणालाही न सांगता निघून गेली. तिला अज्ञात व्यक्तीने पळविल्याचा आरोप करीत, १८ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अकोट पोलिसांनी तत्काळ भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. मुलीचा शोध सुरू असताना, २० जानेवारी रोजी बेपत्ता मुलगी आपल्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. मुलीला सुरक्षित बघून पोलिसांना दिलासा मिळाला. मात्र, मुलगी व आईने घडलेल्या घटनेची आपबिती पोलिसांना सांगितली. अपहरणाची तक्रार देणाऱ्या सावत्र पित्याने मुलीला सात महिन्यांपूर्वी अमरावतीवरून अकोटला घरी आणले. या ठिकाणी तो सतत तिच्यावर बळजबरीने अत्याचार करायचा. एकदिवस त्याने मुलीला थंडपेयामधून दारू पाजून लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहली. 

दरम्यान, तिने अकोट येथून पलायन करून आईकडे जात, सर्व हकिकत तिला सांगितली. त्यामुळे आई व मुलीने अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी सावत्र पित्याविरुद्ध भादंवि कलम ३५४,३७६,५०४ सह पाेक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी सावत्र पित्याला शहर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे करीत आहेत.

खाकी वर्दीची मानवता...

पीडित अल्पवयीन मुलगी व आई हे गरीब कुटुंबातील आहेत. त्यांची हलाखीची परिस्थिती पाहता, खाकी वर्दीलाही पाझर फुटला. माणुसकी, सहृदयेतून पोलिसांनी पीडित मुलगी व तिच्या आईच्या जेवणासह निवासाची उत्तम व्यवस्था केली. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणAkolaअकोला