शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता जैन मुनींच्या शरिराचे ९ तुकडे; ३० फूट खोल बोअरवेलमध्ये सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 10:29 IST

चिक्कोडीजवळील बेपत्ता जैन मुनींचा निर्घृण खून; दोघांना अटक

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडीजवळील हिरेकोडी येथील बेपत्ता जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. रायबागजवळील कटकभावी गावाजवळ मृतदेहाचे नऊ तुकडे बोअरवेलमधून काढण्यात आले आहेत. जैन मुनीजी बुधवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार हिरेकोडी येथील आश्रमातील भक्तांनी शुक्रवारी केली होती. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, जमीन किंवा आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी जैन मुनींचा मृतदेह सापडला. मारेकऱ्यांनी जैन मुनींच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून बोअरवेलमध्ये फेकून दिले होते. कटकभावी गावच्या हद्दीतील बोअरवेलमध्ये मुनींच्या शरीराचे तुकडे टाकून मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बोअरवेलच्या २५ फूट खोलवर रक्ताने माखलेली साडी व टॉवेल आढळून आला. बेळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी तक्रार आल्यानंतर चिक्कोडी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात सापडलेले पुरावे मिळवून माहिती संकलित केली. त्याच दिवशी रात्री स्वामीजींच्या ओळखीची व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आल्याची माहिती समोर आली. तपासात एकाच व्यक्तीने खून केल्याचे निष्पन्न झाले.

मृतदेह शोधमोहीम आणि सुरक्षेसाठी ५०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. स्वामीजींचा मृतदेह ३० फूट खोलवर आढळला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एसपींनी आरोपींची नावे उघड करण्यास नकार दिला.

जैन मुनींचे पार्थिव बेळगावला पाठविले

खून झालेल्या जैन मुनींच्या मृतदेहाचे तुकडे कटकबावी येथून शवविच्छेदनासाठी बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. रविवारी हिरेकोडी येथील नंदीपर्वत आश्रमात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती भाविकांनी दिली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी