शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी ९ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:46 IST

ठाणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून, त्यापैकी चार आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

ठाणे: अपहृत अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात मुलीच्या पालकांसह आजी, आत्या अशा नऊ जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार मीरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून, त्यापैकी चार आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. उर्वरित चौघांचा शोध सुरू असून, त्यातील तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक करत आहेत.पीडित मुलगी ही १६ वर्षे नऊ महिन्यांची असताना मीरा रोड परिसरातील आत्याच्या घरातून १ आॅगस्ट, २०१९ रोजी अचानक बेपत्ता झाली होती. त्या वेळी तिच्या आत्याने मीरा रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. जवळपास तीन महिन्यांनंतर वसईतील ३७ वर्षीय इसम तिला घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्या वेळी पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना बोलावून मुलीची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करायचा का, अशी विचारणा केली; परंतु तिच्या पालकांनी तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून मुलीला त्यांच्या ताब्यात दिले.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेत पीडित मुलगी ही आपली पत्नी असल्याचा दावा तिला पोलीस ठाण्यात दाखल करणाऱ्या इसमाने केला. त्या वेळी याचिकेसोबत मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि विवाह प्रमाणपत्रही जोडले. मात्र, एकूणच प्रकरणाविषयी न्यायालयाला शंका आल्याने न्यायालयाने पीडित मुलीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. ती न्यायालयात आल्यावर तिच्या आईवडिलांची चौकशी, तसेच डीएनए चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.चौकशीदरम्यान पीडित मुलीला तिचे आईवडील, आत्या आणि आजीने अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडून तो पैसा स्वत:साठी वापरल्याचे उघड झाले. त्यानुसार, अपहरणाची तक्रार करणारी आत्या यात आरोपी असून, मुलीला पळवून नेणाºया इसमानेही तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून, चार आरोपी पोलीस कोठडीत, तर एक जण न्यायालयीन कोठडीत आहे. पीडित मुलीच्या पतीसह दोन आत्या व एक महिला असे चौघे फरार आहेत. चौघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.२० मार्चला अटकपूर्व जामिनावर सुनावणीफरार असलेल्या तिघांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर २० मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षकांनी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, या गुन्ह्याचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक करत असल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे