शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये फुटीरतावाद्यांनी गावाला घेरले, गोळीबारात ९ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 12:23 IST

सशस्त्र फुटीरतावाद्यांनी इम्फाळचा पूर्व जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खमेनलोक भागात गावकऱ्यांवर भ्याड हल्ला केला आहे.

मणिपूरमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला हिंसाचार आजही सुरुच आहे. सरकार आणि नागरिकांना तणाव निवळला असे वाटत नाही तोच गोळीबाराच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री एका गावात मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला आहे. यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १० अन्य नागरिक जखमी झाले आहेत.

सशस्त्र फुटीरतावाद्यांनी इम्फाळचा पूर्व जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खमेनलोक भागात गावकऱ्यांवर भ्याड हल्ला केला आहे. पहाटे १ वाजता हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. या सर्वांना इम्फाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आदिवासी बहुल भाग आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी देखील या भागात गोळीबार झाला होता. यामध्ये नऊ लोक जखमी झाले होते. फुटीरतावादी आणि ग्रामीणांमध्ये सोमवारी रात्री उशिरा गोळीबार झाला होता. दोन्ही बाजुचे नऊजण जखमी झाले होते. मणिपूरमध्ये गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात किमान 100 लोकांचा मृत्यू झाला असून 310 जण जखमी झाले आहेत. राज्यातील 16 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार