शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! आठवी पास मुलाने Youtube व्हिडीओ पाहून बनवला बँक लुटण्याचा प्लॅन आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 16:01 IST

युट्यूबवरील व्हिडीओ पाहून आरोपींनी बँकेत दरोडा टाकण्याची योजना आखली होती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेचा दरवाजाही फोडला होता.

पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेट बँकेत फिल्मी स्टाईलमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. युट्यूबवरील व्हिडीओ पाहून आरोपीने बँकेत दरोडा टाकण्याची योजना आखली होती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेचा दरवाजाही फोडला होता.

दरवाजा तोडल्यानंतर तो एकटाच दरोडा टाकण्यासाठी बँकेत घुसला, मात्र तेवढ्यात बँकेतील इमर्जन्सी अलार्म वाजला. अलार्म वाजल्यानंतर त्याने बँकेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो पकडला गेला.

समीर अन्सारी असं आठवी पास झालेल्या या तरुणाचं नाव आहे. त्याची दरोड्याची योजना ऐकून पोलीसही चकित झाले. पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या तरुणाने यूट्यूब व्हिडीओ पाहून दरोड्याची योजना आखली होती. आरोपी पुरुलिया हुडा पोलीस ठाण्याच्या दुमदुमी गावात आहे.

पुरुलिया जिल्ह्याचे पोलीस एसपी अभिजीत बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण दरोड्याच्या घटनेच्या मोडस ऑपरेंडीची सविस्तर माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी ड्रिल मशीन, जॅमर इत्यादी अत्याधुनिक उपकरणे वापरली होती. युट्युबवरून त्याने प्रशिक्षण घेतलं होतं.

एसपीने पुढे सांगितले की त्याच्या घरातून उपकरणांशी जुळणाऱ्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. आता त्याच्यासोबत आणखी कोणी होतं की नाही, याचा शोध पोलीस घेत आहेत. जिल्ह्याच्या एसपींनी असंही सांगितलं की बँकेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी बँकेचा दरवाजा बाहेरून लावला होता जेणेकरून पाहणाऱ्यांना सर्व काही ठीक आहे असं वाटेल. त्याने आपला चेहरा मास्कने झाकला होता. गेल्या शनिवारी रात्री 8.50 च्या सुमारास पुरुलिया-बांकुरा 60-ए राष्ट्रीय महामार्गावरील हुडा येथे सरकारी बँक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. बँकेचा इमर्जन्सी अलार्म वाजताच तो पळून गेला. पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून बॅग, अत्याधुनिक व्हॉल्ट कटर आणि वायर जप्त केली आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी गुन्हेगाराची ओळख पटवली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी