शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतून 89 किलो गांजा जप्त; एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 17:28 IST

उपायुक्तांच्या पथकाने केली कारवाई

ठळक मुद्दे सुमारे 1 लाख 76 हजार 250 रुपये किमतीचा 89 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.चौकशीत त्याचे नाव मोहम्मद इम्रान सादिक अली शहा (23) असल्याचे सांगितले.

नवी मुंबई - परिमंडळ उपआयुक्तांच्या विशेष पथकाने वाशीतून 89 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून तो गोवंडीचा राहणारा आहे. त्याच्याकडून नवी मुंबई परिसरातील छोटय़ा गांजा विक्रेत्यांना पुरवठा केला जात होता.

वाशी गाव परिसरात एकजन गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक जी. डी. देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त पंकज डहाणो, सहायक आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवडे यांच्या पथकाने रविवारी रात्री सापळा रचला होता. यावेळी संशयास्पदरित्या वावरणारया एकाला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत त्याचे नाव मोहम्मद इम्रान सादिक अली शहा (23) असल्याचे सांगितले. त्याच्या अंग झडतीमध्ये एक किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी त्याला अटक केली असता, चौकशीत त्याने वाशीत मोठय़ा प्रमाणात गांजाचा साठा केल्याचे कबुल केले. यानुसार पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकून त्याठिकाणावरुन 88 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त केला. त्यानुसार त्याच्याकडून सुमारे 1 लाख 76 हजार 250 रुपये किमतीचा 89 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी त्याच्याविरोधात वाशी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई परिसरात गांजा विक्री करणारया छोटय़ा मोठय़ा विक्रेत्यांना तो गांजा पुरवत होता. याकरिता त्याने भाडोत्री जागेमध्ये गांजाचा साठा केला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई