शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

विविध सराफांकडून चोरीतील ७३ तोळे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2022 21:40 IST

सराईत चोरट्यासह साथीदाराला अटक, दादर पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अनिल कांबळेला दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ३३ लाख किंमतीचा ऐवज जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. चोरीतील सोने विविध सराफाना विकले होते. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे.

 दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सीताराम राणे (६०) हे गणपती निमित्ताने गावी  गेले असताना २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरातून ७३७ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू आणि ३५०० रुपयांची रोकड चोरीला गेली. यामध्ये एकूण २९ लाख रुपयांची चोरी झाल्याप्रकरणी दादर पोलिसांनी  गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. त्यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी अनुराग मोहन दुबे (६५) हे  कामानिमित्त गुजरातला गेले असताना त्यांच्या घराच्या खिडकीतून प्रवेश  करत  ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ किलो चांदिच्या वस्तु आणि ४४९४ अमेरीकन डॉलर असा एकूण ६ लाख २९ हजार ५२०रुपयांचा मुद्देमाल चोरी गेले होता. याप्रकरणीही दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांनी खळबळ उडाली.

 दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीचा शोध सुरु  केला. याच दरम्यान दादर पोलिसांनी  ३१ ऑगस्ट रोजी वरळीच्या आदर्श नगर येथून निखील अनिल कांबळे याला एका घरामध्ये चोरी करताना रंगेहाथ पकडले.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत दादरमधील दोन्ही गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे उघड होताच या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.कांबळेच्या चौकशीतून साथीदार मोहंम्मद अकबर अक्रम शेख यांना अटक करण्यात आली.

कांबळे आणि शेख हा सराईत गुन्हेगार असून कुर्ला येथील नेहरू नगर पोलीस चौकीच्या मागील झोपडपट्टीत राहण्यास आहे.  आरोपींकडून ७३ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. यामध्ये एकूण ३३ लाख किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात नेहरूनगर, कुर्ला, पोलीस ठाण्यात ९ हुन अधिक गुन्हे नोंद आहेत. आरोपीकडून  ३३ लाख किंमतीचा १ किलो चांदी, ५८ ग्रॅम सोन्याची लगड, ३९४४ अमेरीकन डॉलर तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील १ किलो चांदी, ६९२ ग्रॅम सोन्याची लगड असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.