शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सोनू निगमच्या वडिलांच्या घरात ७२ लाखांची चोरी, माजी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 06:18 IST

निकिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ओशिवऱ्यातील विंडसर ग्रँड या इमारतीत अगमकुमार हे एकटेच फोर बीएचकेमध्ये राहतात.

मुंबई : प्रसिद्ध प्ले बॅक सिंगर सोनू निगम यांचे वडील अगमकुमार (७६) यांच्या ओशिवऱ्यातील घरात जवळपास ७२ लाखांची घरफोडी करण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी सोनूची बहीण निकिता (३८) हिने ओशिवरा पोलिस ठाण्यात त्यांच्या माजी ड्रायव्हरवर संशय व्यक्त केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निकिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ओशिवऱ्यातील विंडसर ग्रँड या इमारतीत अगमकुमार हे एकटेच फोर बीएचकेमध्ये राहतात. त्यांच्या फ्लॅटमध्ये एक लाकडी कपाटात डिजिटल पासवर्ड असलेले लोखंडी लॉकर आहे. ८ महिन्यांपूर्वी अगमकुमार यांच्या गाडीवर रेहान नामक व्यक्ती ड्रायव्हर म्हणून नियुक्त होता. मात्र तो काम नीट करत नसल्याने त्याला काढून टाकण्यात आले. १८ मार्च रोजी अगमकुमार यांना कामाचे ७२ लाख रुपये मिळाले, जे त्यांनी घरातील कपाटाच्या डिजिटल लॉकरमध्ये ठेवले.

दुसऱ्या दिवशी त्यांनी लॉकर उघडून पाहिले तेव्हा त्यातील ४० लाख रुपये गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. २० मार्च रोजी अगमकुमार आणि निकिता हे काही कामासाठी सोनू यांच्या घरी गेले. मात्र घरी परतल्यावर लॉकरमधील ३२ लाख रुपये चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेज तपास असता  रेहान १९ व २० मार्च रोजी अगमकुमार यांच्या घराजवळून सुटकेस घेऊन जाताना दिसला. त्यामुळे त्यानेच बेडरूमचा दरवाजा डुप्लिकेट चावीने उघडून चोरी केल्याचा संशय निकिता आणि तिच्या वडिलांना आहे. 

टॅग्स :Sonu nigamसोनू निगम