शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपरमध्ये कारमध्ये सापडले 72 लाख; निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई, आयकर विभागाकडून तपासणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 05:40 IST

मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम वाशीतील विकासकाची असल्याचे त्यांनी सांगितले असून, या प्रकरणाचा आयकर विभाग तपास करत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या नीलयोग मॉलबाहेर एका कारमधून इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्व्हेलन्स स्क्वाडने ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपयांची रोकड जप्त केली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम वाशीतील विकासकाची असल्याचे त्यांनी सांगितले असून, या प्रकरणाचा आयकर विभाग तपास करत आहे.नीलयोग मॉलसमोर एका कारमधून लाखो रुपये आणले जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निवडणूक सेलने वाहनाची तपासणी केली असता त्यात ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये आढळले. या कारमधील दिलीप वेलजी नाथानी (५२), अतुल वेलजी नाथानी (५४) यांची चौकशी केली असता ते इन्कम टॅक्स प्रॅक्टिसनर व सीए  असल्याचे निष्पन्न झाले. ही रोकड वाशीतील अक्षर ग्रुप बिल्डर भरत पटेल यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. 

चौकशीअंती योग्य कारवाईपुढील कारवाईसाठी दोघांना वाहनासह पंतनगर पोलिस ठाण्यात आणले. तेथे डेप्युटी कलेक्टर रवींद्र ठाकरे, तहसीलदार वृषाली पाटील व अन्य अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी मनीष कुमार यांनी चौकशी सुरू केली असून, सध्या ही रक्कम आयकर विभागाने ताब्यात घेतली आहे. चौकशीअंती योग्य कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. गेल्या निवडणुकीत १० कोटींची रोकड जप्त २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान मुंबई पोलिसांनी १९ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.  १० कोटी ५१ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आणि तब्बल ४० कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले. तसेच, ३९१ अवैध शस्त्रही हस्तगत केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी