पोलीस शिपायाने घेतली सात हजारांची लाच; ACB नं रंगेहाथ पकडलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 10:56 PM2021-11-17T22:56:56+5:302021-11-17T22:57:03+5:30

9 नोव्हेंबरला दोन व्यक्तींमध्ये भांडण झाले. यात ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस नाईक सुरेश दुर्गे याने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती

7,000 bribe taken by police constable; ACB grabbed the red hand | पोलीस शिपायाने घेतली सात हजारांची लाच; ACB नं रंगेहाथ पकडलं

पोलीस शिपायाने घेतली सात हजारांची लाच; ACB नं रंगेहाथ पकडलं

Next

 आष्टी (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस नाईक सुरेश दुर्गे याला आज रात्री लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

9 नोव्हेंबरला दोन व्यक्तींमध्ये भांडण झाले. यात ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस नाईक सुरेश दुर्गे याने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडअंती 7 हजारावर डील करण्यात आली होती. त्याअनुषंगाने आज 17 नोव्हेंबरला रात्री 7 हजार रुपयांची लाच घेताना दुर्गे याला रंगेहात पकडण्यात आले,अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिली. या पोलीस स्टेशनमध्ये या अगोदर ही 17 सप्टेंबरला दोन पोलिस कर्मचारी दारु पकडल्याप्रकरणी तडजोड करण्यासाठी लाच घेतांना रंगेहात पकडल्या गेले होते. दोन महिन्यांच्या कालावधीतच ही दुसरी लाचेची घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

Web Title: 7,000 bribe taken by police constable; ACB grabbed the red hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.