शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रेसकोर्सच्या पार्किंगमधून ७० वर्षीय आजोबांची दुचाकी चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 03:02 IST

सुरक्षा भेदून महालक्ष्मी रेसकोर्सच्या पार्किंगमधून ७० वर्षीय आजोबांची दुचाकी चोरण्यात आली आहे. या प्रकरणी रविवारी ताडदेव पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - सुरक्षा भेदून महालक्ष्मी रेसकोर्सच्या पार्किंगमधून ७० वर्षीय आजोबांची दुचाकी चोरण्यात आली आहे. या प्रकरणी रविवारी ताडदेव पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.उल्हास अनंतराव सावंत (७०) असे या आजोबांचे नाव असून ते परळमध्ये राहतात. पार्टटाइम छपाईचे काम करणारे सावंत २००१ पासून महालक्ष्मी रेसकोर्स येथे व्यायामासाठी येतात. दीड वर्षापूर्वी त्यांच्या मुलाने दुचाकी विकत घेतली. त्याच दुचाकीवरून ते रेसकोर्सला येत असत. १ मे रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता दुचाकी घेऊन आले. रेसकोर्स गेट क्रमांक १ व २ येथील पार्किंगमधील सुरक्षारक्षकाच्या केबिनसमोर दुचाकी पार्क करून ते आत गेले.तासाभराने ते परतले असता दुचाकी गायब होती. बरीच शोधाशोध करूनही दुचाकी न सापडल्याने दुचाकी टोइंग केल्याच्या संशयावरून त्यांनी ताडदेव वाहतूक चौकी येथे जाऊन चौकशी केली. मात्र, तेथे दुचाकी नव्हती. मित्रांनी गंमत म्हणून दुचाकी लपविली असावी असे वाटून त्यांच्याकडेही चौकशी केली. मात्र तेथेही दुचाकी न सापडल्याने अखेर रविवारी त्यांनी पोलिसांत तक्रार केली. दुचाकीच्या डिक्कीत हेल्मेट, चष्मा, मोटारसायकलचे इन्शुरन्स, पी.यू.सी., आर.सी. बुक. इत्यादी कागदपत्रे होती.सावंत यांच्या तक्रारीनंतर, गुन्हा दाखल करीत ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तत्काळ शोध सुरू केला. यात, एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे.यापूर्वीही झाली होती कारची चोरीयेथे वाहनांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र अशी वाहतूक व्यवस्था आहे. त्यासाठी सुरक्षारक्षकही तेथे तैनात आहेत. मात्र, व्यायामासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांच्या वाहनांकडे सुरक्षारक्षक लक्ष देत नसल्याचे तक्रारदार सावंत यांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी या पार्किंग लॉटमधून कार चोरी झाली होती. मात्र तपासाअंती ती हस्तगत करण्यात आली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी