शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून उकळले 7 लाख; सोशल मीडियावर झालेली मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 14:50 IST

तरुणाने नकळत तरुणीचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 7.12 लाख रुपये उकळले.

एका तरुणीला सोशल मीडियावरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. सोशल मीडियावर हाय-हॅलो, मग मैत्री, मग फोनवर इंटिमेट गॉसिप आणि व्हिडीओ कॉलिंग असा संवाद सुरू झाला. तरुणाने नकळत तरुणीचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 7.12 लाख रुपये उकळले. तरुणीला पैसे देता आले नसल्याने हा व्हिडीओ व्हायरल केला. पाकूरच्या नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. 

तरुणीने पोलिसांना सांगितले की, बिहारच्या बांका जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मनीष कुमारने दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर तिच्याशी मैत्री केली. मैत्रीसाठी तो स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेत असे. यादरम्यान त्याने माझी फसवणूक केली आणि माझा अश्लील व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ​​पैशांची मागणी करू लागला. माझी इज्जत वाचवण्यासाठी मी त्याला बँक खात्यातून 7.12 लाख रुपये 7 हप्त्यांमध्ये दिले आहेत.

तरुणीने सांगितले की, तिने हे पती आणि घरच्यांना सांगितले नाही. मी भागलपूरलाही अनेक वेळा पैसे पाठवले आहेत. आता पैसे देऊ शकत नसल्याने आरोपी तरुणाने माझा व्हिडीओ व्हायरल केला. तिने आरोपीच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाची माहिती दिली. पण त्यांनीही मदत केली नाही आणि मनीषच्या वागण्यात काही बदल झाला नाही. मनीषच्या आई आणि बहिणीने तर मनीष आणि पैसे दोन्ही विसरून जा असे सांगितले.

शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी सांगितले की, या लोकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. तरुणाने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडून 7.12 लाख रुपये घेतल्याचे महिलेचे म्हणणे आहे. आरोपी तरुणाच्या आई आणि बहिणीचाही यात समावेश आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस विविध पैलूंचा तपास करत आहेत. लवकरच प्रकरण उघड होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी