शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

नर्सिंग होममधील २२ दिवसांच्या बाळाचा सात लाखांत सौदा; उल्हासनगरला डॉक्टरसह पाच जणांना ठोकल्या बेड्या

By सदानंद नाईक | Updated: May 19, 2023 09:33 IST

डॉ. चित्रा चैनानी हिच्यासह या नर्सिंग होममधील दोन सहकारी संगीता व प्रतिभा, मूल विकणारा पुरुष दलाल डेमन्ना आणि एक महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

उल्हासनगर : शहरातील कॅम्प क्रमांक ३ येथील महालक्ष्मी नर्सिंग होममधील अवघ्या २२ दिवसांच्या बाळाची सात लाख रुपयांत विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार ठाणे क्राईम ब्रँचने उघडकीस आणून पाच जणांना अटक केली. डॉ. चित्रा चैनानी हिच्यासह या नर्सिंग होममधील दोन सहकारी संगीता व प्रतिभा, मूल विकणारा पुरुष दलाल डेमन्ना आणि एक महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

 महालक्ष्मी नर्सिंग होममधील एका लहान बाळाची विक्री होत असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचला मिळाल्यावर, त्यांनी बुधवारी ३ वाजता छापा टाकला. लहान मुलाच्या विक्रीचा सौदा होत असल्याची माहिती समाजसेविका सानिया हिंदुजा, राष्ट्रवादीचे सोनू पंजाबी यांना मिळाली होती. त्यांनी ठाणे क्राईम ब्रँचशी संपर्क साधून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, कृष्णा कोकणी, महिला पोलिस तेजश्री शेडके यांना माहिती दिली. महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये एका महिलेला बनावट ग्राहक बनून पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. 

बनावट ग्राहक म्हणून पाठविलेल्या महिलेने, आपल्याला दोन मुली असून मुलगा हवा आहे, असे सांगितल्यावर २२ दिवसांच्या बाळाचा सात लाखांत सौदा झाला. नर्सिंग होमच्या डॉ. चित्रा चैनानी, यांच्या सहकारी संगीता, प्रतिभा आणि बेळगावमधील मूल विकणारा दलाल डेमन्ना आणि मूल विकण्यास तयार झालेली महिला (नाव उघड केलेले नाही) यांना ताब्यात घेण्यात आले.

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. महालक्ष्मी नर्सिंग होममधून आतापर्यंत किती लहान मुलांची विक्री करण्यात आली, याचा तपास करण्यासाठी १० जणांचे पथक स्थापन केल्याची माहिती कड यांनी दिली. या घटनेने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.

बाळांच्या विक्रीचे रॅकेट?शहरात यापूर्वीही लहान बाळांच्या विक्रीचे प्रकरण गाजले होते. यामध्ये नर्सिंग होमच्या डॉक्टरसह सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. महालक्ष्मी नर्सिंग होममधून आतापर्यंत काही बाळांची विक्री झाल्याची चर्चा सुरू आहे. याचा तपास सुरू आहे.

ग्राहक बघून किंमतअवघ्या २२ दिवसांच्या बाळाची सात लाखांना विक्री झाल्याचे प्रस्तुत प्रकरणात उघड झाले आहे. परंतु ग्राहक बघून वेगवेगळ्या रकमेला बाळांची विक्री होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस