छत्तीसगडमधून आणलेली ६५ हजारांची तंबाखू जप्त, दुचाकीच्या सहाय्याने सुरू होती वाहतूक

By दिगांबर जवादे | Published: October 8, 2023 09:30 PM2023-10-08T21:30:01+5:302023-10-08T21:30:17+5:30

कुरखेडा पाेलिसांची कारवाई

65,000 worth of tobacco brought from Chhattisgarh seized, transportation was started with the help of a two-wheeler | छत्तीसगडमधून आणलेली ६५ हजारांची तंबाखू जप्त, दुचाकीच्या सहाय्याने सुरू होती वाहतूक

छत्तीसगडमधून आणलेली ६५ हजारांची तंबाखू जप्त, दुचाकीच्या सहाय्याने सुरू होती वाहतूक

googlenewsNext

दिगांबर जवादे, गडचिराेली: कोरचीवरून कूरखेडा मार्गे प्रतिबंधित असलेला सूगंधीत तंबाकूची वाहतूक करताना एका दूचाकी चालकाची गोठणगाव नाक्यावर तपासणी करीत दोन चूंगळीत भरलेले ४०० पाॅकिट सूगंधीत तंबाखू जप्त केले. आरोपी मनोज गंभीर बोरूले (३२) रा. बेलगाव तालुका कोरची याच्या विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्तीसगड व कोरची परिसरातून मोठ्या प्रमाणात सूगंधीत तंबाखूची वाहतूक तालूक्यात करण्यात येते. या गोपनीय माहितीवरून कूरखेडा पोलिसांनी गोठणगाव नाक्यावर सापळा रचला. दूचाकी वाहनाने मनोज गंभीर बोरूले हा इसम दोन चूंगळीत काही तरी वस्तू घेऊन संशयास्पदरीत्या येताना दिसून आला. वाहनाला थांबवत झडती घेण्यात आली. यावेळी चूंगळीत प्रतिबंधित सूगंधीत तंबाखूचे ४०० नग पाॅकिट आढळून आले. त्याची किंमत ६५ हजार ६०० रूपये एवढी आहे. दुचाकीची किंमत ९० हजार रूपये आहे. दुचाकी व तंबाखू मिळून १ लाख ५५ हजार ६०० रूपयांचा मूद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरोधात भादंवि २७२,२७३,१८८ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही ठाणेदार संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव डोकरमारे, पोलीस हवालदार भास्कर किरंगे, संदेश भैसारे यांच्या चमूने केली

Web Title: 65,000 worth of tobacco brought from Chhattisgarh seized, transportation was started with the help of a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.