BREAKING : ६४० टन पाकिस्तानी खारीक जप्त, डीआरआयने केली चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 06:02 PM2019-09-06T18:02:34+5:302019-09-06T18:05:28+5:30

साडे आठ कोटीची कर चुकवेगिरी 

640 tonnes of Pakistani dates seized, four arrested by DRI | BREAKING : ६४० टन पाकिस्तानी खारीक जप्त, डीआरआयने केली चौघांना अटक 

BREAKING : ६४० टन पाकिस्तानी खारीक जप्त, डीआरआयने केली चौघांना अटक 

googlenewsNext
ठळक मुद्दे न्हावाशेवा येथे आणण्यात आलेले ४० टन वजनाच्या १६ कंटेनरमधील सुमारे ६४० टन खारीक जप्त करण्यात आले.याचप्रकारे चैन्नई, गुजरातमध्ये पाठवण्यात आलेल्या खारीकाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

खलील गिरकर
मुंबई - ओमान मार्गे भारतात आणलेले आणि करचुकवेगिरी केलेले तब्बल ६४० टन पाकिस्तानी खारीक जप्त करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर महासंचालनालयने (डीआरआय) ही कारवाई केली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 20 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. डीआरआयचे सहआयुक्त समीर वानखेडे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

पुलवामा हल्ल्यानंतर १६ फेब्रुवारीपासून भारत पाकिस्तानमधील व्यापारी संबंधावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर 200 टक्के कर आकारणी केली जाते. यामधून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानी खारीक ओमानला पाठवण्यात आला व ओमानी खारीक असे दाखवून त्याची भारतात निर्यात करण्यात आली. मात्र, डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार याबाबत चौकशी करण्यात आल्यावर हे बिंग फुटले. न्हावाशेवा येथे आणण्यात आलेले ४० टन वजनाच्या १६ कंटेनरमधील सुमारे ६४० टन खारीक जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या खारीकावर २०० टक्के प्रमाणे तब्बल ८ कोटी ५० लाख रुपये कर देण्याची गरज होती. मात्र, ते चुकवण्यासाठी हे खारीक ओमान मार्गे पाठवण्यात आले होते. मात्र, डीआरआयच्या सशक्त नेटवर्कमुळे ते जप्त करण्यात आले. याचप्रकारे चैन्नई, गुजरातमध्ये पाठवण्यात आलेल्या खारीकाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील व्यापार मर्यादित झालेला असताना अशा प्रकारे फसवणूक व कर चोरी करुन व्यापार करणाऱ्यांविरोधात झालेली ही पहिली मोठी कारवाई आहे. या प्रकरणी सीमाशुल्क कायदा 1962 च्या कलम 104, 135(1)ए व बी प्रमाणे गुन्हा नोंदवून इम्रान तेली, इरफान नुरसुमार, मोहनदास कटारिया व सेवक मखिजा या चार आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये आणखी कोणी आंतरराष्ट्रीय माफिया गुंतलेले आहेत का? याची चौकशी केली जात आहे.

Web Title: 640 tonnes of Pakistani dates seized, four arrested by DRI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.