शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

महा ई-सेवा केंद्र, 'आपले सरकार'ची वेबसाइट हॅक करून ६३ प्रतिज्ञालेख काढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 10:14 IST

पासवर्ड हॅक करून दोन्ही केंद्रांमधून परस्पर ६३ आॅफलाइन प्रतिज्ञालेख काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगायगाव : अत्यंत सुरक्षित व महत्त्वपूर्ण असलेली महा ई-सेवा केंद्र ,आपले सरकारची वेबसाइट हॅक करून गायगाव व पारस येथील सेतू केंद्रामधून वॉलेटमधील पैशांचा उपयोग पासवर्ड हॅक करून दोन्ही केंद्रांमधून परस्पर ६३ आॅफलाइन प्रतिज्ञालेख काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही संचालकांना आर्थिक फटका बसण्यासोबतच त्यांचे केंद्र अज्ञात व्यक्तीने वापरले. या प्रकरणी उरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून, अधिक तपासासाठी प्रकरण सायबर सेलकडे पाठविण्यात येणार आहे.जिल्हा, तालुका व गावोगावी महाआॅनलाइनद्वारे आपले सरकार ,महा ई-सेवा केंद्र नागरिकांसाठी कार्यरत असून, याद्वारे नागरिकांना उत्पन्न, जात, अधिवास, नॉन क्रिमिलेअर आदी दाखले व इतर शासकीय सेवा या केंद्रांमधून आॅफलाइन व आॅनलाइन अशा पद्धतीने पुरविल्या जातात. सोबतच या केंद्रांना सीएससी अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणूनदेखील मान्यता देण्यात आली आहे; मात्र जिल्ह्यातील ही केंद्रे २२ मार्चपासून लॉकडाउनमुळे बंद आहेत.याचा फायदा अज्ञात टोळीने उठवित अत्यंत सुरक्षित व महत्त्वपूर्ण असलेली महा ई- सेवा केंद्र ,आपले सरकारची वेबसाईट हॅक करून १८ मे रोजी गायगाव येथील केंद्रातून ३५ व पारस येथील सेतू केंद्रामधून २८ वॉलेटमधील पैशांचा उपयोग करीत दोन्ही केंद्रांमधून परस्पर ६३ आॅफलाइन प्रतिज्ञालेख काढल्याची घटना उघडकीस आली. सेतू केंद्रांचा आयडी व पासवर्ड ट्रेस करून ही दोन्ही केंद्रे अज्ञात व्यक्ती किंवा टोळीने हॅक केली; मात्र सध्या जिल्ह्यातील सर्वच सेतू केंद्रे बंदच असल्यामुळे आणखी किती केंद्रांमध्ये हा प्रकार घडला असेल हे तूर्तास तरी समजू शकत नाही; मात्र अनेकांची फसगत झाल्याची शक्यता असून, या टोळीने संपूर्ण राज्यात असला प्रकार करून नागरिकांना बोगस प्रमाणपत्र देण्यासोबतच लाखो रुपयांवर डल्ला मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी सेतू केंद्र चालक ज्ञानेश्वर शेंडे यांनी उरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

गायगाव येथील सेतू केंद्र हॅक करून अज्ञात व्यक्तीने काढलेल्या प्रतिज्ञालेखाबाबतची घटना गंभीर आहे. केंद्र संचालकांनी रीतसर तक्रार आम्हाला दिली आहे. हा प्रकार सायबर गुन्हा असून, अधिक तपासासाठी प्रकरण सायबर सेलकडे पाठविण्यात आले आहे.- विलास पाटील,ठाणेदार, उरळ पोलीस स्टेशन

गायगाव व पारस येथील केंद्र हॅक झाल्याची घटना गंभीर स्वरूपाची आहे. जिल्ह्यात इतर केंद्रांबाबतही हा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील सर्व केंद्रचालकांना त्वरित पासवर्ड बदलविण्याचा आदेश देण्यात आला आहे. अजूनही काही केंद्र हॅक झाले असल्यास चालकांनी आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी.- चंचल मुजुमदार, जिल्हा व्यवस्थापक, महा आॅनलाइन, अकोला

 

 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAkolaअकोला