शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत ५७३ वाहनांची चोरी, अवघ्या १५३ वाहनांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 07:51 IST

लॉकडाऊनच्या काळात ‘लॉक’ झालेली रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा ‘अनलॉक’ झाल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. यातच, गेल्या दोन महिन्यांत मुंबईतून ५७३ वाहने चोरीला गेली आहेत.

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात ‘लॉक’ झालेली रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा ‘अनलॉक’ झाल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. यातच, गेल्या दोन महिन्यांत मुंबईतून ५७३ वाहने चोरीला गेली आहेत. यातील अवघ्या १५३ वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या २ महिन्यांत मुंबईत एकूण ६ हजार १६८ गुन्हे नोंद झाले. यापैकी ३ हजार ४८० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ७ हजार १५५ होता. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या मुख्यत्वेकरून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरू होताच गुह्यांचे प्रमाण पुन्हा जैसे थे झाले आहे. गेल्या २ महिन्यांत वाहन चोरीचे २ हजार ५१७ गुन्हे पोलीस दफ्तरी नोंद झाले आहेत. पाेलिसांनी त्यांचा तपास हाती घेतला असला तरी आतापर्यंत यापैकी अवघ्या ९०० वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात, १२५ ने वाढ झाली आहे. दिवसाला ८ ते ९ वाहने चोरीला जात असल्याने मुंबईकरांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.  

भंगारात पार्टची विक्री... तर कुठे बनावट क्रमांकाच्या आधारे विक्रीnरस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळ्या त्यांच्या पार्ट्सची मुंबईसह मुंबईबाहेर विक्री करतात. मुंबईतही बऱ्याच गॅरेजमध्ये यांची कमी भावात खरेदी करतात. तर काही जण त्यांना भंगारातील दुचाकींचे इंजीन नंबर लावत त्यांची विक्री करतात. nभंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायच्या, त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी शोधून ती दुचाकी चोरायची आणि त्या नंबरचा वापर करून ती तिसऱ्याला विकायची. अशा टोळ्यांवर मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :carकारCrime Newsगुन्हेगारी