शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

औषध निरीक्षकाकडे सापडले ५२ लाखांचे घबाड, सीबीआयकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 06:01 IST

सीबीआयकडून अटक; १३ लाख ९० हजारांची रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण (सीडीएससीओ) या संस्थेत कार्यरत एका औषध निरीक्षकाकडे त्याच्या उत्पन्न स्त्रोतापेक्षा तब्बल १५४ टक्के अधिक मालमत्तेचे घबाड सापडले आहे. 

सीबीआयने या निरीक्षकाच्या घरी केलेल्या छापेमारीत १३ लाख ९० रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. या छापेमारीत औषध निरीक्षक आणि त्याच्या पत्नीच्या नावे विविध बँकांतील आणि सरकारी योजनांतील ठेवी, अशी एकूण ५२ लाख ९५ हजार ९७५ रुपयांची मालमत्ताही सापडली आहे.अहमदाबाद येथे औषध निरीक्षक आणि वैद्यकीय उपकरण अधिकारी या पदावर पराग गौतम हे कार्यरत आहे. त्याने व्यापारी जिनिश पटेल यांच्याकडून मालखरेदीसाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी पटेल यांनी सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर गौतम याला लाच स्वीकारताना अटक केली.

स्वयंपाक सुविधांवर लाखोंचा खर्चगौतम याने घरातील स्वयंपाक सुविधांवर २३ लाख खर्च केले. तर, त्याच्या पत्नीच्या नावे उत्तर प्रदेश येथे भूखंड असल्याचेही कागदपत्रांवरून दिसून आले, तर छाप्यादरम्यान १४ हजार १०० रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि ४ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही सापडले. या दागिन्यांच्या खरेदीचा कोणताही स्त्रोत गौतम याला सांगता आला नाही.

वार्षिक उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गौतम याला अटक केल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी छापेमारी केली. या छापेमारीत त्यांना मोठे घबाड सापडले. या छापेमारीत गौतम आणि त्याच्या पत्नीच्या नावे विविध बँकांतील आणि सरकारी योजनांतील ठेवी अशी एकूण ५२ लाख ९५ हजार ९७५ रुपयांची मालमत्ता सापडली आहे. त्याच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा त्याच्याकडे सापडलेली मालमत्ताही सुमारे १५४ टक्के जास्त आहे. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबई