शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

बांग्लादेशात छापल्या 500 च्या नोटा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 05:19 IST

एकाला अटक :  एक १ लाख ८५ हजारांचे चलन जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भारतीय चलनाच्या १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा सोमवारी जप्त करण्यात आल्या आहेत. बांग्लादेश येथून मालदामार्गे या नोटा नवी मुंबईत विक्रीसाठी आणल्या होत्या. याप्रकरणी नोटा घेऊन आलेल्या सलीम अली असरील हकल (वय ३०) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने यापूर्वी लाखो रुपयांच्या नोटा चलनात आणल्या असल्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे बांग्लादेश येथून पुरवठा होणाऱ्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा राज्यभरात वापरात आणल्या जात असल्याचे समोर आले आहे. तळोजा येथील एका व्यक्तीकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असल्याची माहिती गुन्हे मध्यवर्ती शाखेचे सहायक निरीक्षक गंगाधर देवडे यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असता बनावट ग्राहक तयार करण्यात आले होते. या ग्राहकाला भेटून नोटांचा व्यवहार करण्यासाठी एकजण सीबीडी येथे येणार होता. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, ज्ञानेश्वर भेदोडकर आदींच्या पथकाने सीबीडी रेल्वेस्थानक आवारात सापळा रचला होता. यावेळी नोटा घेऊन आलेल्या सलीम अली असरील हक (वय ३०) ला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एक लाख रुपयांच्या ५०० च्या बनावट नोटा आढळल्या.त्याच्या तळोजा येथील घरावर टाकलेल्या छाप्यात ८५ हजारांच्या ५०० च्या नोटा आढळून आल्या. हक हा मूळचा पश्चिम बंगालमधील मालदा येथील राहणारा आहे. त्याला बांग्लादेशमधून भारतात विक्रीसाठी या बनावट नोटा पुरविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार या नोटा घेऊन तो नवी मुंबई परिसरात निम्म्या किमतीत विक्रीसाठी ग्राहक शोधत होता. त्याने यापूर्वी लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची शक्यता आहे.

नोटांची हुबेहूब छपाईजप्त केलेल्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा या हुबेहूब खऱ्या नोटांप्रमाणे आहेत. केवळ पेपरचा दर्जा काहीसा हलका असल्याने अत्यंत बारकाईने पाहिल्यास त्या ओळखल्या जाऊ शकतात. त्यामुळे भारतीय चलनाच्या तंतोतंत मिळत्याजुळत्या बनावट नोटा पाहून पोलीसही थक्क झाले आहेत.