शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया पुन्हा हरली! उत्तर प्रदेशमध्ये ५० वर्षे वयाच्या महिलेची सामूहिक बलात्कार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 05:19 IST

Crime News: निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; गुप्तांगात घुसविली लोखंडी सळई 

बदायूँ : निर्भया प्रकरणाची आठवण व्हावी इतक्या क्रूरपणे उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यात ५० वर्षे वयाच्या एका महिलेवर रविवारी सामूहिक बलात्कार करण्यात आला व तिची हत्या करण्यात आली. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसविण्यात आली. याप्रकरणी एका पुजाऱ्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, दोघांना अटक केली आहे. 

या बलात्कार प्रकरणावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे गेल्या १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षे वयाच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार पीडितेच्या गुप्तांगात व पायांना जखमा झाल्याचे व मारहाणीत बरगड्या मोडल्याचे उत्तरीय तपासणीत आढळून आले. ही महिला देवळात दर्शनाला गेली होती. त्यानंतर ती मृतावस्थेत आढळली. या गुन्ह्यातील आरोपी असलेला पुजारी सध्या फरार असून, त्याचा कसून शोध सुरू आहे.

महिला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष : प्रियांका गांधीकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले की, उत्तरप्रदेशमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्या राज्यातील प्रशासनाचा दृष्टिकोन चांगला नाही. हाथरसच्या बलात्कार प्रकरणात राज्य सरकारच्या प्रशासनाने पीडितेच्या म्हणण्याकडे दुर्लक्षच केले. बदायूँत जिथे बलात्कार झाला त्या ठिकाणाची पोलिसांनी तपासणीही केली नाही.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपRapeबलात्कार