शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

एक लिटर मिश्रित केमिकलमध्ये ५० लिटर दूध तयार; पोलिस तपासात उघड

By दत्ता यादव | Updated: July 2, 2023 21:16 IST

पोलिसांच्या तपासात निष्पन्न; लाखो लिटर भेसळयुक्त दूध विकले

सातारा: दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा एलसीबीने पर्दाफाश केल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती तपासात समोर येत आहे. एक लिटर मिश्रित  केमिकलमध्ये  तब्बल ५० लिटर दूध तयार केले जात होते. केमिकल मिसळून तयार केलेले हे दूध आरोग्यासाठी धोकादायक असून, आतापर्यंत किती लोकांनी हे दूध सेवन केले. याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. दूध भेसळप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

बजरंग पांडुरंग जाधव (रा. खराडे, ता. कऱ्हाड, जि. सातारा), गणेश सुनील पनासे (रा. हेळगाव, ता. कऱ्हाड, जि. सातारा), सोमनाथ रंगराव कदम (रा. गायकवाडवाडी, ता. कऱ्हाड), शरद वामन घार्गे, सचिन शंकर यादव, गणेश सुभाष मसुगडे (तिघेही रा. नवीन कवठे, ता. कऱ्हाड), अर्जुनकुमार श्रीकांत गाैतम, विवेककुमार श्रीरामचंद्र गौतम, अजयकुमार गाैतम (तिघेही रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरामध्ये नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ या ठिकाणी संकलन केलेल्या दुधामध्ये भेसळ सुरू असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शनिवारी रात्री तेथे जाऊन छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी नऊ जणांना अटक केली तर त्यांच्याकडून चार वाहनेही पोलिसांनी जप्त केली.

एलसीबीचे पोलिस अंमलदार सुधीर बनकर, अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, हसन तडवी, राकेश खांडके, पृथ्वीराज जाधव, मोहसिन मोमीन आदींनी या कारवाईत भाग घेतला.

अशी केली जात होती भेसळ..

व्हाईट लिक्विड, सोडीयम बाय कार्बोनेट, पिरॅमिट पावडर, रिफाइंड सोयाबीन हे केमिकल एक लिटर पाण्यामध्ये मिसळल्यानंतर त्यातून तब्बल ५० लिटर दूध तयार केले जात होते. जेव्हा या ठिकाणी छापा टाकण्यात आला तेव्हा पोलिसांना ९ हजार लिटर भेसळयुक्त दूध आढळून आले. म्हणजे आतापर्यंत लाखो लिटर भेसळयुक्त दूध विकले असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :milkदूधsatara-acसाताराPoliceपोलिस