धक्कादायक! तुरुंगात ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा महिलेवर १० दिवस बलात्कार  

By कुणाल गवाणकर | Published: October 19, 2020 01:20 PM2020-10-19T13:20:39+5:302020-10-19T13:21:12+5:30

Crime News: तुरुंगातील पाहणी दरम्यान प्रकार उघडकीस; न्यायालयीन चौकशीचे आदेश

5 policemen gang rape 20 year old woman in lock up for 10 days in madhya pradesh | धक्कादायक! तुरुंगात ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा महिलेवर १० दिवस बलात्कार  

धक्कादायक! तुरुंगात ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा महिलेवर १० दिवस बलात्कार  

googlenewsNext

भोपाळ: पोलीस कर्मचाऱ्यांनी तुरुंगात सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. खुनाचा आरोप असलेल्या २० वर्षीय महिलेनं पाच पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. मध्य प्रदेशातल्या रेवा जिल्ह्यातल्या मंगावन शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मे महिन्यात पोलिसांनी १० दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. 

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, विधि अधिकारी आणि दोन वकिलांनी १० ऑक्टोबरला तुरुंगाची पाहणी केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तुरुंगात असलेल्या पीडित महिलेनं तिची व्यथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांना सांगितली. त्यानंतर या प्रकरणी न्यायाधीशांनी न्यायालयीन चौकशीचे दिले. रेवाचे पोलीस अधीक्षक राकेश सिंह यांनी या प्रकरणावर भाष्य करताना वेगळाच दावा केला. '९ मे ते २१ मे दरम्यान अत्याचार झाल्याची तक्रार संबंधित महिलेनं केली आहे. मात्र आम्ही तिला आणि तिच्या मैत्रिणीला २१ मे रोजी अटक केली. खुनाच्या आरोपाखाली मंगावान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघींना ताब्यात घेण्यात आलं,' असं सिंह यांनी सांगितलं.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी १० ऑक्टोबरला तुरुंगाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या विधि पथकातले वकील सतीश मिश्रांनी पीडित महिलेकडे इतके महिने गप्प का राहिलीस, याबद्दल विचारणा केली. त्यावर तीन महिन्यांपूर्वी आपली आपबिती वॉर्डनच्या कानावर घातली होती. अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी तुरुंगातच असल्यानं याबद्दल भीती वाटत होती, असं पीडितेनं सांगितल्याची माहिती मिश्रांनी दिली. 

तुरुंगात घडलेल्या प्रकाराबद्दल वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांनी खून प्रकरणात गोवण्यात येईल, अशी धमकी पोलिसांनी दिली होती. पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार ३ महिन्यांपूर्वी आपल्याला सांगितला होता, याची माहिती वॉर्डननं दिली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी तिचा जबाब नोंदवला. तो जिल्हा न्यायाधीशांकडे पाठवण्यात आला. यानंतर या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले.
 

Web Title: 5 policemen gang rape 20 year old woman in lock up for 10 days in madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.