शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरुणींना बेदम मारहाण करणाऱ्या 'त्या' टवाळखोरांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 15:21 IST

Crime News : दोन तरुणींचा विनयभंग देखील करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अखेर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

कल्याण - कल्याण नजीक असलेल्या मलंगगडच्या पायथ्याशी फिरायला गेलेल्या तरुण तरुणींना काही टवाळखोरांकडून मारहाण करण्यात आली होती. इतकंच नाही तर दोन तरुणींचा विनयभंग देखील करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अखेर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. यावेळी या टवाळखोरांच्या कचाट्यातून तरुण तरुणींनी आपली सुटका करून घेतली होती.

नेवाळी पोलीस चौकी गाठून घडलेला प्रकार सांगितला. मात्र मेडिकल करून या तसेच येथे तक्रार होणार नाही असं येथील पोलिसांनी त्यांना सांगत कानावर हात ठेवले. यातील पीडित तरुणीने हिंमत दाखवत सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली. त्यानंतर याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या तपासासाठी दोन पथक रवाना करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी पाच आरोपीना अटक करण्यात आली असून यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. 

संतापजनक! तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत बेदम मारहाण, दोघींचा विनयभंग 

सर्व आरोपी घटनास्थळापासून जवळ असलेल्या  कुशवली गावातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही जोर धरू लागली होती.  मात्र संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या या टवाळखोरांना हा अधिकार कोणी दिला आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिसArrestअटक