मीरारोड - मीरारोडच्या हाटकेश भागात पोलिसांनी ५ नायजेरीयन नागरीकांना अटक करुन त्यांच्याकडील अडिज लाख किंमतीचे कोकेन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले तसेच ८ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.मीरारोडच्या हाटकेश येथील पटेल इमारतीमध्ये नायझेरियन नागरीकांचे बेकायदा वास्तव्य असून तेथे ते बार चालवत आहेत. तसेच अमली पदार्थाची विक्री व सेवन होत असल्याची माहिती सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नवघरचे सहाय्यक निरीक्षक व काशिमीराचे उपनिरीक्षक बांगर आणि पोलीस पथकाने धाड टाकुन सेरी जेन्टस वेस, ओर्जी मॉसेस फिलीप्स, उम्ही ओगबोन पीटर, मिचल ओटी निकोलस व ओलीवर ब्रस्लोव या पाच जणांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता कोकेन पावडर सापडली.पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली असुन त्यांच्या कडील अडिज लाखांची कोकेन पावडर व पावणेतीन लाखांचे ८ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी कोकेन कुठून आणले होते याचा तपास केला जात आहे. या आधी देखील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नायझेरियन नागरीकांवर कारवाई करण्यात आली होती. तर मुंबई पोलीसांनी सुध्दा याच भागातून नायझेरियन नागरीकांना अटक करुन नेले होते.
मीरा रोडमधून कोकेनसह ५ नायझेरियन नागरीकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 21:19 IST
मीरारोडच्या हाटकेश येथील पटेल इमारतीमध्ये नायझेरियन नागरीकांचे बेकायदा वास्तव्य असून तेथे ते बार चालवत आहेत. तसेच अमली पदार्थाची विक्री व सेवन होत असल्याची माहिती सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती.
मीरा रोडमधून कोकेनसह ५ नायझेरियन नागरीकांना अटक
ठळक मुद्देअडिज लाख किंमतीचे कोकेन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले तसेच ८ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.अमली पदार्थाची विक्री व सेवन होत असल्याची माहिती सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती.