शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाचे उत्पन्न दाखविले ५ लाख, बँक खात्यात सापडले ६० कोटी; पाहून आयकर अधिकाऱ्यांची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 16:48 IST

Income Tax: आयकर विभागाने करचोरांविरोधात देशभरात एक अभियान सुरु केले आहे.  या अभियानाद्वारे अशा लोकांची ओळख पटविली जात आहे. या लोकांना वारंवार नोटीस पाठवूनही ते आयकर अधिकाऱ्यांसमोर हजर होत नाहीएत.

आयकर चोरी करत असलेल्यांचा अडचणींत आता वाढ होणार आहे. आयकर विभाग एक विशेष अभियान सुरु करणार आहे. याद्वारे आयकराची चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. मुंबईच्या एका व्यक्तीने त्याचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये असल्याचे दाखविले होते. मात्र, त्याच्या खात्यात ६० कोटी रुपये जमा असल्याचे पाहून आयकर अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे. 

आयकर विभागाने करचोरांविरोधात देशभरात एक अभियान सुरु केले आहे.  या अभियानाद्वारे अशा लोकांची ओळख पटविली जात आहे. या लोकांना वारंवार नोटीस पाठवूनही ते आयकर अधिकाऱ्यांसमोर हजर होत नाहीएत. हे असे लोक आहेत ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला परंतू तो विसंगत असल्याने व्हेरिफाय करण्यासाठी आयकर विभागाने नोटीसा पाठविल्या होत्या. आता आयकर विभागाने या लोकांना शोधणे आणि त्यांच्याकडून दंडासह कराची रक्कम वसुलण्याची मोहीम काढली आहे. 

महसूल विभागाच्या सुत्रांनी सांगितले की,  अनेक लोक मुद्दामहून कर परताव्याच्या नोटीसीकडे दुर्लक्ष करत असल्याचे आयकर विभागाला समजले आहे. या लोकांना ईमेल, एसएमएस आणि कागदी नोटीस पाठविण्यात आली आहे. तरीही ते आयकर विभागाला संपर्क करत नाहीएत. 

आयकर विभागाला आत चकमा देणे सोपे राहिलेले नाही. आयकर विभागात आता फेसलेल असेसमेंट सिस्टीम लागू करण्यात आली आहे. मुंबईच्या एका अशा व्यक्तीची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. या व्यक्तीने वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये दाखविले आहे, मात्र त्याच्या खात्यात 12 कोटी रुपये रोखीने जमा केलेले होते. यानंतर तपासात त्याच्या खात्यात असे 60 कोटी रुपये जमा झाल्याचे समजले. या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सापडलेल्या डायरीत या नोंदी सापडल्याने आयकर विभागाचे अधिकारीही पाहतच राहिले होते. 

असाच एक प्रकार गुतरातच्या राजकोटमध्ये उघड झाला आहे. त्यानेही वर्षाचे उत्पन्न 5 लाख रुपये दाखविले होते. मात्र, एका वर्षात त्याच्या खात्यात 10 कोटी रुपये जमा झाले आणि 7.5 कोटी रुपये काढण्यात आले. या व्यक्तीला सहा नोटीस आणि 10 एसएमएस पाठविण्यात आले होते.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सMumbaiमुंबई