शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गाडीत लाखोंची रोकड; काँग्रेसच्या तीन आमदारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 07:28 IST

झारखंडचे आमदार; बंगालमध्ये कारवाई . आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करायचे आहे. साड्या खरेदी करण्यासाठी हे पैसे घेऊन आम्ही प. बंगालला आलो होतो, असा दावा.

हावडा : झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांच्या गाडीत ४९ लाखांची रोकड आढळली होती. एवढी मोठी रक्कम सोबत बाळगण्याचे कारण ते सांगू शकले नाहीत. त्यामुळे पश्चिम बंगालच्या हावडा ग्रामीण पोलिसांनी रविवारी त्यांना अटक केली. 

या आमदारांची एसयूव्ही काल सायंकाळी महामार्ग क्रमांक १६ वरील राणीहाती येथे अडवून हावडा ग्रामीण पोलिसांनी झडती घेतली. तेव्हा गाडीत ही रोकड आढळली. या आमदारांना एवढी मोठी रोकड घेऊन जाण्याचे कारण सांगता आले नाही. आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करायचे आहे. साड्या खरेदी करण्यासाठी हे पैसे घेऊन आम्ही प. बंगालला आलो होतो, असा दावा इरफान अन्सारी, राजेश कच्छप, नमन बिक्सल कोंगरी या आमदारांनी केला. मात्र, त्यांचा दावा पटत नसल्याने अधिक चौकशीसाठी  या आमदारांना त्यांचा चालक व अन्य एकासह आज अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. या पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने  या घटनेचा तपास हावडा ग्रामीण पोलिसांकडून स्वत:कडे घेतला आहे. 

तिघांचेही निलंबनnपश्चिम बंगालमध्ये मोठ्या रकमेसह अटक करण्यात आलेल्या झारखंडमधील आपल्या तीन आमदारांना काॅंग्रेसने रविवारी निलंबित केले. भाजप झारखंडमधील आपले आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करतानाच झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील हे सरकार सुरक्षित व स्थिर असून कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास काॅंग्रेसने व्यक्त केला. nलोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे निर्लज्जपणे अस्थिर करून लोकशाहीचे तुकडे पाडण्यात येत आहेत. झारखंडमधील सरकार अस्थिर करण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. वेळोवेळी आमदारांशी संपर्क साधण्यात येतोय, त्यांना प्रलोभने दाखवली जात आहेत, काहींना धमकावलेही जात आहे, असा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेस