शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१६० सदनिकाधारकांची ४४.२५ काेटींची फसवणूक, तळोजा पोलिस ठाण्यात चार जणांसह आजी-माजी संचालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 08:54 IST

गणेश कुंदन सिंग बिष्ट हे सेक्टर १७, खारघर येथे राहत असून, २०१० मध्ये त्यांना हेक्स ब्लॉक्स प्रोजेक्ट व बिल्डरचे कार्यालय दिसले.

नवीन पनवेल : विकासकाने १६० सदनिकाधारकांकडून ४४ कोटी २५ लाख ७१ हजार ८५ रुपये स्वीकारले. मात्र, करारनाम्यानुसार दिलेल्या मुदतीत घराचा (प्लॅट) ताबा दिला नाही. त्यामुळे सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी मनूला मेहबुल्ला काचवाला, ललित श्याम टेकचंदानी, काजोल ललित टेकचंदानी, अरुण हसानंद मखिजानी आणि आजी-माजी संचालक व इतरांविरोधात १५ जानेवारी रोजी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश कुंदन सिंग बिष्ट हे सेक्टर १७, खारघर येथे राहत असून, २०१० मध्ये त्यांना हेक्स ब्लॉक्स प्रोजेक्ट व बिल्डरचे कार्यालय दिसले. यावेळी त्यांना सुप्रीम कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक प्रोजेक्टचे बांधकाम करत असल्याचे समजले. सदनिकेची किंमत ८० लाख रुपये सांगण्यात आली.

बजेट ३० लाखांचे असल्याने त्यांनी त्यांच्याच कंपनीच्या मालकीचे रोहिंजण येथील हेक्स सिटी नावाचे बांधकाम सुरू होणार असे सांगितले. त्यांना साईटवर नेले असता, प्लॉटवर पत्र्याचे कंपाउंड व गेटवर सुप्रीम कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंटचा  बोर्ड लावलेला दिसला. तसेच बांधकामासाठी आवश्यक सरकारी परवानगी घेतल्याचे सांगितले. येथे सहा महिन्यांत बांधकाम सुरू होईल. यात एमएमआरडीएचा सहभाग असल्याचे सांगितले.

इतर आजी-माजी संचालक कोण?हेक्स सिटी प्रकल्पात राज्यमंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते सांभाळणाऱ्या एका मोठ्या नेत्याचे नातलग भागीदार असल्याने मागेही एका  ग्राहकाच्या तक्रारीवरून पाेलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यामुळे याही गुन्ह्याचे धागेदाेरे तिथेपर्यंत असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

चुकीची माहिती देऊन दिशाभूल२०१४ मध्ये सदनिकेचा ताबा देणार असल्याचे बिल्डरकडून आश्वासन दिले. त्यांनी सदनिका बुक केली. २०१४ ते २०१९ दरम्यान गृहकर्ज घेऊन रक्कम अदा केली. एकूण ३१ लाख २९ हजार रुपये देण्यात आले. सदनिका खरेदी करारनाम्याचे रजिस्ट्रेशन केले. बिल्डरने बांधकाम प्रकल्पाचे नाव हेक्स सिटीवरून क्लेन सिटी असे केले. मात्र प्रोजेक्ट पूर्ण केला नाही. संपर्क केला असता, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी कंपनीचे ऑफिसही बंद केले. 

या प्रकल्पात एकूण १ हजार ८०० लोकांनी सदनिका बुक केल्याचे बुकिंगधारकांकडून समजले. त्यामुळे १६० सदनिकाधारकांनी एकत्र येऊन फ्लॅट मिळण्यासाठी सुप्रीम कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे राबवण्यात येणारा प्रोजेक्टचा पाठपुरावा व त्याबाबत संघर्ष केला. त्यामुळे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी