शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

WhatsAppवर न्यूड व्हिडीओ कॉल, ब्लॅकमेल करून ४३ लाख लुबाडले;नेमकं प्रकरण काय, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 17:41 IST

राजस्थानमधील एका १९ वर्षीय मुलाने नवी मुंबईतील ३४ वर्षीय व्यक्तीला अनेक व्हॉट्सअॅप कॉल केले.

व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन अनेकांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला नवी मुंबई सायबर पोलिसांनी राजस्थान येथून जेरबंद केले आहे. हलीम फरीद खान (१९) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने एका फिर्यादीला अशाच प्रकारे धमकावून त्याच्याकडून ४३ लाख २२ हजार ९०० रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या फिर्यादीच्या तक्रारीवरून नवी मुंबई सायबर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी मे ते ऑगस्ट दरम्यान राजस्थानमधील एका १९ वर्षीय मुलाने नवी मुंबईतील ३४ वर्षीय व्यक्तीला अनेक व्हॉट्सअॅप कॉल केले. यावेळी दोघेही नग्नावस्थेत बोलत राहिले, जे आरोपीने रेकॉर्ड केले. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे एक एक करून त्याने पीडितेकडून ४३ लाख रुपये लुटले. त्यानंतरही तो तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. अखेर कंटाळून पीडितेने नवी मुंबईच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३८४ (खंडणी), ४२० (फसवणूक) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. ब्लॅकमेलिंग कॉल राजस्थानमधून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर लोकेशन ट्रेस करताना पोलिसांचे पथक राजस्थानच्या डीग भागात पोहोचले. पुराव्याच्या आधारे १९ वर्षीय आरोपी हमील फरीद खान याला २४ डिसेंबर रोजी राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या पालडी या दुर्गम गावातून अटक करण्यात आली होती. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी सांगितले की, आरोपीने युट्यूबवर अश्लील व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देऊन तक्रारदाराकडून एकूण ४३,२२,९०० रुपये उकळले. त्याच्या ताब्यातून अनेक मोबाईल फोन, सिमकार्ड आणि एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. पीडितेचे पैसेही जप्त करण्यात आले आहेत, जे आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले होते.

गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबईत लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सन २०२१मध्ये लैंगिक शोषणाचे ५४ गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी २४ प्रकरणांमध्ये ३३ जणांना अटक करण्यात आली होती. या २४ पैकी ४ प्रकरणे अशी होती ज्यात पीडितेकडून १० लाख रुपयांहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली. २०२२ मध्ये लैंगिक शोषणाचे एकूण ७७ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३० गुन्ह्यांमध्ये ५२ जणांना अटक करण्यात आली आहे. या ७७ पैकी २२ प्रकरणांमध्ये आरोपींनी पीडितेकडून १० लाखांपेक्षा जास्त रक्कम घेतली होती. काही महिन्यांपूर्वी सेक्सटोर्शन रॅकेट चालवणाऱ्यांनी मुंबईतील ७१ वर्षीय व्यावसायिकाकडून ५१ लाख रुपये उकळले होते. अशा प्रकारे टोळीचे सदस्य सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना टार्गेट करून त्यांना आपला बळी बनवतात.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई