शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News | मुरूम वाहतुकदारांकडून ४० हजारांची लाच, दोन तलाठ्यांसह मध्यस्थ ACBच्या जाळ्यात

By बापू सोळुंके | Updated: December 30, 2022 23:55 IST

'फोन पे'द्वारे घेतली दहा हजार रुपये लाच

बापू सोळुंके, औरंगाबाद:  मुरूम,खडी वाहतुकदाराच्या हायवा वर कारवाई न करण्यासाठी  ४० हजार रुपये लाच घेताना दोन तलाठ्यांसह खाजगी मध्यस्थांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात लाचखोरांविरोधात गुन्हा नोंदिवण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. तलाठी ज्ञानेश्वर महालकर (५२,नेमणूक रांजणगाव खुरी, ता. पैठण ),तलाठी देविदास बनाईत (५४,  नेमणूक- मुलाणी वडगाव व लोहगाव, ता. पैठण) आणि मध्यस्थ खाजगी व्यक्ती शिवाजी इथापे (४०)अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

या कारवाई विषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, याप्रकरणातील तक्रारदार हे हायवा मालक असून ते मुरूम आणि खडी वाहतूक करण्याचा व्यवसाय करतात. यादरम्यान २९ डिसेंबर रोजी तलाठी महालकर याने तक्रारदार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांच्या हद्दीतून गौण खनिजाची सुरळीत वाहतूक सुरू ठेवण्यासाठी स्वत:साठी ३० हजार रुपये तर मुलाणी वाडगावचे तलाठी देविदास बनाईत करीता ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नाेंदविली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा पंचासमक्ष महालकरने स्वत:साठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. एवढेच नव्हे तर बनाईत यास फोन करून त्याच्यासाठी ४० हजार रुपये तक्रारदाराकडे मागितल्याचे कळविले. लाचखोरांना पकडण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ३० डिसंबर रोजी सापळा रचला असता. तेव्हा आरोपी महालकरने १० हजार रुपये लाच फोन पे वर घेेतली. तर बनाईतच्या सांगण्यावरून मध्यस्थ इथापेने ४० हजार रुपये घेतले.

लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खंबे ,उपअधीक्षक मारोती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता इटूबोने,  पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पो.ना. बाळासाहेब राठोड, पो. ना. विलास चव्हाण यांनी केली. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद