शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधून येणारा ४०० किलो गांजा मंठा पोलिसाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:49 IST

जिंतूर- मंठा मार्गावरील हेलस पाटीजवळ ट्रक ताब्यात

ठळक मुद्देपोलिसांनी ४०० किलोचा गांजा साठा केला जप्त

जालना : तिरूअनंतपूरम येथून जालनामार्गे ट्रकमध्ये नेण्यात येणारा तब्बल ४०० किलो गांजा मंठा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जिंतूर- मंठा मार्गावरील हेलस पाटीजवळ करण्यात आली. पोलिसांनी तब्बल ४०० किलो गांजा जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

केरळ राज्यातून गांजा घेऊन येणारा एक ट्रक जालना- मंठा रोडवरून जात असल्याची माहिती मंठा पोलीस ठाण्याचे पोनि विलास निकम यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी पहाटे हेलस पाटीजवळ सापळा रचून एक ट्रक (क्र.एम.एच.२०- डी.ई.६७७७) ताब्यात घेतला. पोलिसांनी ट्रकमध्ये तपासणी केली असता जवळपास ४०० किलोच्यावर गांजा आढळून आला आहे. गांजासह ट्रक व चालक संजय सिंघल (रा. वैजापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी सकाळी सुरू होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील एका घरावर कारवाई करून तब्बल ७१ किलो गांजा जप्त केला होता. त्यानंतर मंठा पोलिसांनी चक्क ४०० किलो गांजाची वाहतूक करणारा ट्रक पकडल्याने गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस