शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

गुजरातमध्ये ४०० कोटींचं ड्रग्स जप्त; पाकिस्तानी बोटीसह ६ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 17:39 IST

400 crore drugs seized in Gujarat :आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत ४०० कोटी रुपये इतकी असून सध्या अधिक तपास सुरु आहे.

गांधीनगर - गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले आहे. भारताच्या जल हद्दीत ६ चालकांसह पाकिस्तानी नौका ताब्यात घेण्यात आली आहे. अल-हुसैनी नावाची पाकिस्तानी नौका असून अधिकाऱ्यांना गस्त घालत असताना गुजरात किनारपट्टीजवळ ही पाकिस्तानी नौका दिसली. त्यावर असलेल्या सहा संशयितांना अटक कऱण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत ४०० कोटी रुपये इतकी असून सध्या अधिक तपास सुरु आहे.

गुजरात सीमेवर घुसखोरांवर करडी नजर ठेवणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या आणि एटीएसच्या संयुक्त कारवाईदरम्यान पाकिस्तानी बोट अल-हुसैनी आढळली. त्यानंतर जवानांनी तात्काळ बोटीवर कारवाई करत मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेतले. बोटीवर असणारे सर्वजण हेरॉइनची तस्करी करणार  होते. 

एप्रिल महिन्यात अरबी समुद्राला लागून असलेल्या भारतीय सागरी सीमेवर भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एक बोट पकडली असून त्यात ८ पाकिस्तानी नागरिक होते. तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पथकाने ८ पाकिस्तानी नागरिकांकडून ३० किलो हेरॉईन जप्त केले आहे. अधिकृत माहितीनुसार, ही बोट कच्छ जिल्ह्यातील जाखू बीचजवळ पकडली गेली. भारतीय तटरक्षक दलाने काही वेळापूर्वी पकडलेल्या पाकिस्तानी आणि हिरोईनविषयी माहिती दिली होती.आयटीजीने ट्विटरवर म्हटले आहे की, “एटीएसगुजरातबरोबर संयुक्त कारवाईत आयसीजीने भारतीय समुद्री क्षेत्रातील आयएमबीएल (आंतरराष्ट्रीय मेरीटाइम बॉर्डर लाइन) जवळ पाकिस्तानी नौका पीएफबी (पाकिस्तानी मासेमारीची बोट) पकडली,” आयसीजीने ट्विटरवर म्हटले होते. यात बोटीत ८ पाकिस्तानी नागरिक आणि ३० किलो हेरॉईन होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसAnti Terrorist SquadएटीएसArrestअटक