शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

४ महिने प्लॅनिंग, सीक्रेट सिम, सूनेनं प्रियकरासोबत मिळून घडवलं दुहेरी हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 15:23 IST

जेव्हा पोलिसांनी मोनिकाची चौकशी केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी मोबाईल फोन तपासला.

नवी दिल्ली - शहरातील गोकुलपुरी परिसरात वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती. त्याबाबत तपासात मोठा खुलासा झाला आहे. दुहेरी हत्याकांडाच्या आरोपात पोलिसांनी सूनेला अटक केली आहे. सासू-सासऱ्यांमुळे सूनेला तिच्या प्रियकराला भेटता येत नव्हते. त्यामुळे ४ महिन्यापूर्वी महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून वृद्ध जोडप्याच्या हत्येचा कट रचला. प्रियकर आशिषने त्याच्या साथीदारासोबत हे हत्याकांड घडवले. परंतु एक फिचर फोन आणि सीक्रेट सिमकार्डने पोलखोल झाली. सध्या आशिष फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, गोकुलपुरी इथं सोमवारी एका घरात वृद्ध जोडप्याची लुटीनंतर हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी ७.३० वाजता जोडप्याच्या मुलाने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. सुरुवातीला हल्लेखोरांनी घराचा दरवाजा न तोडता बाल्कनीतून प्रवेश घेतल्याचं समोर आले. त्यामुळे घरात उपस्थित व्यक्तींवर हत्येचा संशय आला. पोलिसांनी जोडप्याच्या सून आणि मुलाची वेगवेगळी चौकशी केली. 

४ महिन्यापूर्वी रचला कटजेव्हा पोलिसांनी मोनिकाची चौकशी केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी मोबाईल फोन तपासला. तेव्हा आशिष नावाच्या युवकासोबत ती सातत्याने बोलताना आढळली. पोलिसांनी आशिषबाबत विचारले तेव्हा त्याच्याशी जवळीक असल्याचं ती म्हणाली. पोलिसांचा संशय बळावला तेव्हा त्यांनी कसून चौकशी केली तेव्हा मोनिकाने आशिषसोबत मिळून दुहेरी हत्याकांड घडवले हे कबूल केले. २०२० मध्ये फेसबुकवरून आशिषशी मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. मोनिका विवाहित असूनही आशिषला भेटण्यासाठी हॉटेलला जायची. दोघं फोनवरू संवाद साधायचे. 

पतीला समजला मोनिकाचा कारनामाएकेदिवशी मोनिकाचा मोबाईल पतीच्या हाती लागला. त्याने आशिषसोबतचं चॅट वाचले. तेव्हा दोघांचे नाते समोर आले. पती आणि सासू-सासऱ्यांनी तिच्यावर नजर ठेवली. तिला घरातून बाहेर जाण्यास मनाई केली. मोनिकाला स्मार्टफोनऐवजी साधा मोबाईल दिला. सासू-सासऱ्यांमुळे मोनिकाला आशिषला भेटता येत नव्हते. त्यामुळे डिसेंबरपासून या दोघांना वाटेतून हटवण्याचं प्लॅनिंग सुरू झाले. 

षडयंत्राप्रमाणे दोघांनी नवीन सिम घेतले. त्यावरून दोघे एकमेकांशी बोलत होते. जेणेकरून दोघांमधील संवाद कुणालाही कळू नये. घटनेच्यादिवशी संध्याकाळी ७ वाजता आशिष त्याच्या साथीदारासह मोनिकाच्या घरी पोहचला. मोनिकाने घरचा दरवाजा उघडून त्यांना आत घेतले. त्यानंतर दोघे घरच्या छतावर लपले. मोनिकाने दोघांच्या जेवणाची व्यवस्था केली. रात्री १०.३० वाजता सर्वजण त्यांच्या खोलीत झोपायला गेले तेव्हा आशिषने मोनिकाच्या नव्या नंबरवर फोन करून तिला खोलीतून बाहेर पडू नको असं सांगितले. आशिष आणि त्याच्या साथीदाराने मिळून जोडप्याची हत्या केली आणि घरात चोरी केली. सोमवारी सकाळी मोनिकाचा पती जेव्हा बाहेर आला त्याने आईवडिलांची हत्या झाल्याचं पाहिले आणि हादरला. त्याने मोनिकाला उठवले त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले.