शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती ४ लाखांची रायफल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेही पोलिसांकडे केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 16:39 IST

Salman Khan : हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील बिश्नोई समाजाला काळवीट प्रिय असल्याने काळवीटच्‍या शिकारीमुळे तो सलमान खानवर संतप्त होता, असे तो पुढे म्हणाला.

नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने २०१८ मध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या "हत्येसाठी" सर्व तयारी केल्याचा खुलासा केला आहे. यासाठी त्याने एक खास रायफलही खरेदी केली होती, ज्यासाठी त्याने 4 लाख रुपये खर्च केले होते. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याआधी दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी न्यूज18ला सांगितले की, लॉरेन्सने सलमानला मारण्याचे कारणही सांगितले. हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील बिश्नोई समाजाला काळवीट प्रिय असल्याने काळवीटच्‍या शिकारीमुळे तो सलमान खानवर संतप्त होता, असे तो पुढे म्हणाला.

१९९८ मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानवर काळवीट शिकार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दोन काळवीटांची हत्या केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमानला एप्रिल 2018 मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सलमानने वरच्या न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणात सलमानला काही काळ जोधपूर तुरुंगातही राहावे लागले होते. नंतर त्याला भरतपूर कारागृहात हलवण्यात आले.लॉरेन्स बिश्नोईने पोलिस चौकशीत कबूल केले की, त्याने राजगढमधील रहिवासी संपत नेहराला सलमान खानला मारण्यासाठी मेसेज पाठवले होते. त्यावेळी नेहरा फरार होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्सने सांगितले की, सलमानला मारण्यासाठी संपत नेहराला मुंबईत पाठवले होते. त्याने अभिनेत्याच्या घराभोवती रेकीही केली. पण नेहराकडे एकच पिस्तूल होते. त्याच्याकडे लांबचं लक्ष्य हेरणारी  रायफल नव्हती. यामुळे तो सलमानवर हल्ला करू शकला नाही.लॉरेन्सने पोलिसांना सांगितले की, त्यानंतरच त्याने आरके स्प्रिंग रायफल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. लॉरेन्सच्या म्हणण्यानुसार, त्याने दिनेश डागर नावाच्या व्यक्तीला ही रायफल खरेदी करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी चार लाख रुपयेही भरण्यात आले. हे पैसे डागरचे भागीदार अनिल पांडे यांना देण्यात आले. मात्र, २०१८ मध्ये डागरच्या ताब्यातून ही रायफल पोलिसांनी जप्त केली होती.लॉरेन्स बिश्नोई बराच काळ सलमान खानच्या मागे लागला आहे. गेल्या महिन्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीतील तीन जणांनी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पत्राद्वारे धमकी दिल्याचे वृत्त आले होते. सिद्धू यांची 29 मे रोजी पंजाबमधील मानसा येथे अंदाधुंद गोळीबार करून हत्या करण्यात आली होती.

टॅग्स :Salman Khanसलमान खानPoliceपोलिसNew Delhiनवी दिल्लीBlackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरण