शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

सॉफ्टवेअर इंजिनिअरला ३७ लाखांना लावला चुना; शेअर ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष

By अझहर शेख | Updated: July 1, 2024 18:45 IST

याप्रकरणी योगेश प्रविण मुर्डेश्वर (३६,रा.पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : शहर व परिसरात उच्चशिक्षितांची शेअर मार्केटमधील स्टॉकद्वारे आमिष दाखवून गुंतवणूकीला भाग पाडत होणारी लाखो रूपयांची फसवणूक अद्यापही थांबलेली नाही. शहर सायबर पोलिसांकडे अशाप्रकारच्या तक्रारींचा ओघ अजूनही सुरूच आहे. शहरातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर युवकाला ३६ लाख ७० हजार रूपयांना ऑनलाइन चुना लावला. याप्रकरणी योगेश प्रविण मुर्डेश्वर (३६,रा.पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुर्डेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांना १९ मार्च ते १५ मे २०२४ या कालावधीत सायबर गुन्हेगारांनी विविध स्टॉकच्या नावाने टेलिग्राम, व्हॉट्सॲपच्या ग्रुपचे ग्रूप ॲडमीन असलेले संशयित प्रा.रोहन कुलकर्णी, व त्यांचा सहायक राजेश पंडीत यांनी दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. यानंतर त्यांना त्या ग्रूपवर शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेंडिंग, आयपीओची माहिती देत विश्वास जिंकला. त्यांना एक ट्रेडिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. 

त्यांना आभासी स्वरुपात पैशांचा परतावा ऑनलाइन दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी फोन-पे व इंटरनेटद्वारे रकम उकळून तीन महिन्यांत सुमारे ३७ लाख रूपयांची फसवणूक केली. जेव्हा आपली फसवणूक झाल्याचे मुर्डेश्वर यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी शहर सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन करून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 उच्चशिक्षित ठरताहेत बळी! सायबर गुन्हेगारीचे बळी उच्चशिक्षित सुशिक्षित लोक ठरत आहेत. डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, सेवानिवृत्त अधिकारी अशा पेशातील सुशिक्षित लोक सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकल्याचे आतापर्यंतच्या दाखल विविध गुन्ह्यांमधून समोर आले आहे. यामुळे सोशल मीडिया हाताळताना अनावश्यक ॲप्लिकेशन डाऊनलोड करणे टाळलेले बरे, असा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे.

कोणत्या प्रकारचे किती गुन्हे दाखल? बोगस शेअर ट्रेडिंग- १७ऑनलाइन जॉब फ्रॉड- ०५लिंक पाठवून रिमोट ॲक्सेस- ०२बनावट कॉलिंग- ०६डेबिट-क्रेडिट कार्ड- ०१ऑनलाइन खरेदी- ०१

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी