शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३६ वर्षे दुसऱ्याच्या नावाने नोकरी, येत्या ३१ डिसेंबरला होणार निवृत्त; मात्र त्यापूर्वीच झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:02 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधून सरकारी खात्यामधील भ्रष्टाचाराचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. गोरखपूरमध्ये ३६ वर्षांपासून बनावट नावाने नोकरी करणारा एक माणूस आता ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधून सरकारी खात्यामधील भ्रष्टाचाराचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. गोरखपूरमध्ये ३६ वर्षांपासून बनावट नावाने नोकरी करणारा एक माणूस आता ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात गोरखपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बनावट नावाने नोकरी करणाऱ्या रवी प्रकाश चतुर्वेदी यांच्याविरोधात मॅजिस्ट्रेट तपासानंतर ६ डिसेंबर रोजी सरकारला रिपोर्ट पाठवला होता. मात्र आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार गोरखपूरमधील समाजकल्याण विभागामध्ये तैनात असलेला आरोपी रवी प्रकाश चतुर्वेदी याने पदावर ३६ वर्षे नोकरी केली आहे. तसेच आता तो याच महिन्यामध्ये निवृत्त होणार आहे. रवी प्रकाश चतुर्वेदी ज्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने नोकरी करत आहे. ती व्यक्ती त्याच्याच गावातील शेजारी आहे. तसेच त्याचे नाव हे रवी प्रकाश मिश्रा आहे.

याबाबतची तक्रार रवी प्रकाश मिश्रा यांनी दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या नावावर रवी प्रकाश चतुर्वेदी नोकरी करत आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मॅजिस्ट्रियल टीम स्थापित करून तपासाचे आदेश दिले होते. या तपासामध्ये ४ फेब्रुवारी १९८५ रोजी रवि प्रकाश मिश्रा यांच्या नावावर नियुक्ती पत्र जारी झाले होते. तेव्हापासून मिश्रा यांच्या नावावर  रवी प्रकाश चतुर्वेदी नोकरी करत आहे. या प्रकरणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी वशिष्ठ नारायण सिंह यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी मॅजिस्ट्रियल तपास करवून ६ डिसेंबर रोजी रिपोर्ट सरकारला पाठवला आहे.

त्यानंतर आतापर्यंत त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. आता ३६ वर्षांच्या नोकरीनंतर रवी प्रकाश मिश्रा नावाने नोकरी करणारा रवी प्रकाश चतुर्वेदी हा ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या शहरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या रिपोर्टकडे सरकारने गांभीर्याने का पाहिले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकारjobनोकरी