शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हजला पाठवतो सांगून ३५ लाखांचा घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 19:48 IST

नया नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देखेर खान यांनी नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर मंगळवारी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.हज यात्रेसाठी यात्रेकरु पाठवण्याचे काम देखील या ट्रॅव्हल्समार्फत केले जाते.

मीरारोड - हज यात्रेसाठी पाठवतो असं सांगून खोटी बतावणी करून मीरारोडमधील एका व्यक्तीकडून २४ लाख तर दुसऱ्याकडून ११ असे ३५ लाख रुपये आरोपीने घेतले. पैसे घेऊन देखील त्यांना हज यात्रेला न पाठवता फसवणूक केल्याप्रकरणी नया नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाप आणि त्याची दोन मुलं आरोपी असून एका मुलास अटक केली आहे.मीरारोड येथील नया नगर भागातील पुजा नगर येथे सनराईज इमारतीत लकी टुर्स एण्ड ट्रॅव्हल्स आहे. या ट्रॅव्हल्सचा चालक अशपाक कुरेशी (५८ ) हा असून त्याची दोन्ही मुलं वसीम (३१) व मुद्दसीर (३५) असे तिघे मिळून ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. हज यात्रेसाठी यात्रेकरु पाठवण्याचे काम देखील या ट्रॅव्हल्समार्फत केले जाते.नया नगरमध्ये राहणारे फक्रुद्दीन खान (६३ ) यांना यंदाच्या वर्षी हज यात्रेला जायचे असल्याने त्यांनी कुरेशी याच्या ट्रॅव्हल्सशी गेल्या वर्षी संपर्क केला होता. हज यात्रेला जाण्यासाठी गेल्या वर्षी खान यांनी २४ लाख रुपये कुरेशीला दिले होते. परंतु हजयात्रा सुरु झाली आणि संपायला देखील आली असताना कुरेशी मात्र हज यात्रेला पाठवण्यास कारणं पुढे करुन टाळटाळ करत होता. अखेर खान यांनी नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर मंगळवारी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पठाण यांनी तपास करुन मुद्दसीर याला अटक केली आहे. त्याला उद्या गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी आहे. तर कुरेशीला या प्रकाराने हृदयविकाराचा झटका आल्याने त्यास रुग्णालयात दाखल केले आहे. वसीम हा हा ट्रॅव्हल्स मार्फत काही यात्रेकरुंना हज साठी घेऊन गेला असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. खान यांच्यासह नया नगर भागातील तौसिफ खान यांना देखील हज यात्रेसाठी ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आणखी कोणाची फसवणूक तर केली नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटकHaj yatraहज यात्रा