शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त सैनिकांना साडेतीन कोटींचा गंडा; नोकरीच्या अमिषाला २९ सैनिक फसले 

By वैभव गायकर | Updated: August 18, 2023 17:49 IST

खारघर पोलीस ठाण्यात याबाबत ३१ जणांनी लेखी तक्रार दाखल केली असुन यामध्ये जवळपास २९ सैनिक आहेत.

पनवेल : कामाच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत असतात. दररोज याबाबत बातम्या वाचायला मिळतात. मात्र देशाच्या सीमेचे रक्षण केलेल्या निवृत्त सैनिकांना देखील गंडवण्याचे प्रकार सुरु आहेत. खारघर पोलीस ठाण्यात याबाबत ३१ जणांनी लेखी तक्रार दाखल केली असुन यामध्ये जवळपास २९ सैनिक आहेत.

मागील दोन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने ३१ जणांकडून ठराविक पैसे आकारल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही रक्कम दोन लाखांपासून अठरा लाखा पर्यंतच्या घरात आहे.निवृत्त सैनिक असलेले बाळकृष्ण भोसले नामक व्यक्तीने हि फसवणूक केल्याचा आरोप ३१ जणांनी केला आहे. संबंधित व्यक्ती खारघर शहरात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मनसेचे शहर अध्यक्ष गणेश बनकर यांच्याकडे याबाबत फसवणूक झाल्याचा प्रकार आला तेव्हा त्यांनी याबाबत खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत या निवृत्त सैनिकांना तक्रार दाखल करण्यास सांगितली.आरबीआय मध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने हि फसवणूक करण्यात आली आहे.फसवणूक झालेल्यामध्ये पनवेल, मुंबई, पुणे आणि कोंकणातील  निवृत्त सैनिकांचा समावेश आहे. 

नोकरी लागण्यासाठी अनेकांनी कर्ज काढले आहे.मात्र नोकरी तर सोडाच आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे फसवणूक झालेले निवृत्त सैनिक संजय पवार यांनी सांगितले.फसवणूक केलेला इसम सर्रास खुलेआम बाहेर फिरत आहे.पैशाबाबत विचारणा केली असता मी तुम्हाला पैसे परत करेन असे खोटे आश्वासन आम्हाला देत असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.बाळकृष्ण भोसले नामक व्यक्तींशी याबाबत संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद असल्याचे पहावयास मिळाले.

प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवणार निवृत्त सैनिकांच्या आर्थिक फसवणुकीची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे.25 लाखांपेक्षा जास्त आर्थिक फसवणुकीचे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जातो.त्यानुसार आम्ही हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवल्यांनंतर निश्चितच यासंदर्भात तथ्य पाहुन गुन्हा दाखल होईल.- राजीव शेजवळ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,खारघर ) 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी