शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

नोकरीच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक; दोन भामट्यांना अटक : ८० उमेदवारांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 09:46 IST

मेट्रोचे बनावटरीत्या नाव वापरून आरोपी संजय पाटील उर्फ पंकज साळवी आणि त्याची साथीदार दर्शना पराडकर हिने एमएमआरडीएच्या मेट्रो रेल्वेमध्ये नोकरी असल्याची जाहिरात दिली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एमएमआरडीएच्या मेट्रो रेल्वेतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी करून वागळे इस्टेट येथील एका २८ वर्षीय तरुणीसह ८० बेरोजगारांना ३१ लाख २६ हजारांना गंडा घालणाऱ्या दर्शना पराडकर (३२) आणि पंकज साळवी (३३) या दोघांना मंगळवारी रात्री अटक केली. त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

 मेट्रोचे बनावटरीत्या नाव वापरून आरोपी संजय पाटील उर्फ पंकज साळवी आणि त्याची साथीदार दर्शना पराडकर हिने एमएमआरडीएच्या मेट्रो रेल्वेमध्ये नोकरी असल्याची जाहिरात दिली होती. त्याच जाहिरातीच्या आधारे २७ सप्टेंबर २०२० ते ७ मार्च २०२० या कालावधीमध्ये वागळे इस्टेट येथील एका २८ वर्षीय महिलेला स्टेशन मास्तरच्या जागेची ऑफर दिली होती. तिच्यासह अन्यही ७९ तरुणांना मेट्रोl नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३१ लाख  २६  हजार ८०० रुपये घेतले.  त्याबदल्यात त्यांना नोकरीही लावली नाही. तसेच घेतलेले पैसेही परत न करता त्यांची फसवणूक केली. त्याबाबत त्यांनी वारंवार विचारणा करूनही वेगवेगळी उत्तरे दिली. यातील तक्रारदार तरुणीचा या भामट्यांवर संशय बळावल्यामुळे तिने पंकज आणि दर्शना या दोघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांचे आवाहन नोकरीच्या आमिषाने आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी वागळे इस्टेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी केले आहे. यातील आरोपींनी प्रत्येक वेळी आपली नावे वेगवेगळी सांगितल्याचेही समोर आले आहे.